India vs Australia : रोहित-कार्तिकची कमाल, कांगारुंना हरवल्यानंतर भारताच्या ‘या’ चिंता मिटल्या!
India vs Australia : रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिकच्या खेळीच्या बळावर काल झालेल्या आठ षटकांच्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाला धूळ चारली आहे.
India vs Australia T20 Match Live : भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या T20 सामन्यात रोहित शर्माच्या तडाखेबंद खेळीनं भारताना विजय मिळवला आहे. पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या सलग तिन पराभवानंतर आता टिम इंडियानं पहिला विजय साजरा केल्यानं चाहते खुश झाले आहेत. विश्वकप स्पर्धेआधी शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजीचा प्रश्न भारताला सतावत होता. त्यानंतर आता जसप्रित बुमराहनं जबदस्त पुनरागम केल्यानं भारताच्या गोलंदाजीची चिंता मिटली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
याशिवाय काल रोहित शर्मा, केएल राहुल, हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिकनं जोरदार फटकेबाजी केल्यानं संघाच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. परंतु ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतानं जिंकलेल्या या सामन्यात टिम इंडियात काही सकारात्मक बदल पाहायला मिळाले, ते कोणते जाणून घेऊयात.
बुमराहचं पुनरागमन तर अक्षरची कमाल...
गेल्या तीन सामन्यांत डेथ ओव्हरमध्ये रोहितनं भुवनेश्वर कुमारला बॉलिंग दिली होती. परंतु भुवनेश्वरला अखेरच्या षटकांमध्ये मोठ्या धावा काढल्या जात असल्याचं लक्षात येताच कालच्य सामन्यात बुमराहला खेळवण्यात आलं. त्यामुळं आता डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजीचा प्रश्न निकाली लागला आहे. याशिवाय काल फिरकीपटू अक्षर पटेलनं ऑस्ट्रेलियाच्या दोन फलंदाजांना त्रिफळाचित केलं. त्यामुळं आता संघाच्या बॉलिंग युनिटमध्ये उत्साह आल्याचं पाहायला मिळालं.
क्षेत्ररक्षणात सुधारणा...
मोहाली खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यात टिम इंडियानं तीन झेल सोडलं होतं. त्यामुळं भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. परंतु कालच्या दुसऱ्या T20 सामन्यात टिम इंडियानं जबरदस्त फिल्डिंग केली. विराट कोहलीनं एक कॅच सोडली परंतु त्यानंतर लगेचच ग्रीनला रनआऊट केलं. त्यामुळं आता T20 विश्वचषक जवळ येत असताना फिल्डिंगमध्ये सुधारणा होणं, हे भारतीय संघासाठी सकारात्मक लक्षणं आहेत.
कर्णधार रोहित शर्माचा जागतिक विक्रम...
काल आठ षटकांच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मानं हेडलवूडच्या गोलंदाजीवर दोन षटकार मारले. त्यानंतर त्यानं न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलला मागे टाकत T20 मध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिलं स्थान मिळवलं आहे.
पांड्या-कार्तिक फिनिशरचा रोलमध्ये...
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताला जिंकण्यासाठी अखेरच्या षटकात नऊ धावांची गरज होती. हार्दिक पांड्या बाद झालेला होता. परंतु त्यानंतर खेळण्यासाठी आलेल्या दिनेश कार्तिकनं सलग षटकार आणि चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला. त्यामुळं आता हार्दिक आणि कार्तिकच्या रुपात भारताला दोन फिनिशर मिळाले आहेत.