मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs AFG: पाकिस्तानी चाहत्यांची धुलाई, तर भारतीयांसोबत गळाभेट घेत झिंदाबादच्या घोषणा

IND vs AFG: पाकिस्तानी चाहत्यांची धुलाई, तर भारतीयांसोबत गळाभेट घेत झिंदाबादच्या घोषणा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 09, 2022 04:55 PM IST

Afghanistan and Indian fans brotherhood: टीम इंडिया आणि अफगाणिस्तान सामन्यादरम्यानचा एक शानदार व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये भारत आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यांमध्ये बंधुत्वाचे नाते पाहायला मिळाले. व्हिडीओमध्ये अफगाण आणि भारतीय चाहते एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत.

IND vs AFG
IND vs AFG

आशिया चषक २०२२ मध्ये पाकिस्तान आणि श्रीलंका संघाने फायनलमध्ये धडक मारली आहे. तर टीम इंडिया आणि अफगाणिस्तान स्पर्धेबाहेर फेकले गेले आहेत. भारत आणि अफगाणिस्तान यांनी आशिया चषकातील शेवटचा सामना एकमेकांविरुद्ध खेळला. या सामन्यात भारतीय संघ १०१ धावांनी विजयी झाला.

या सामन्यादरम्यानचा एक शानदार व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये भारत आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यांमध्ये बंधुत्वाचे नाते पाहायला मिळाले. व्हिडीओमध्ये अफगाण आणि भारतीय चाहते एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. तसेच, एकत्रितपणाने भारत आणि अफगाणिस्तान जिंदाबादच्या घोषणा देताना दिसत आहेत.

<p>IND vs AFG</p>
IND vs AFG

पाकिस्तान-आफगाणिस्तानच्या चाहत्यांमध्ये हाणामारी

विशेष म्हणजे, या सामन्याच्या एक दिवस आधी अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांच्या खेळाडूंसह चाहत्यांमध्येही चांगलाच राडा झाला होता. मैदानात खेळाडूंमध्ये भांडण झाले. तर प्रेक्षकांमध्येही दोन्ही देशांचे चाहते आपापसांत भिडले होते. याचा व्हिडीओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. व्हिडीओत आफगाणिस्तानचे चाहते पाकिस्तानी चाहत्यांना बेदम मारहाण करताना दिसत होते.

भारत आणि अफगाणिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या

भारतीय आणि अफगाण चाहत्यांनी एकमेकांना मिठी मारतानाचा एक व्हिडिओ अफगाणिस्तानमधील एका व्यक्तीने शेअर केला आहे, जो खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'अफगाणिस्तान आणि भारत यांच्यातील सामन्यादरम्यान दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये बंधुभाव दिसून आला. व्हिडिओमध्ये दोन्ही देशांचे चाहते एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. ते दोघे मिळून भारत झिंदाबाद… अफगाणिस्तान जिंदाबाद… च्या घोषणा देत आहेत.

WhatsApp channel

संबंधित बातम्या