IPL 2023 : अर्जुन तेंडुलकरला ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री प्रीती झिंटाने फटकारलं, म्हणाली...-actress preity zinta criticized fans who trolling arjun tendulkar in ipl 2023 ,क्रीडा बातम्या
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL 2023 : अर्जुन तेंडुलकरला ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री प्रीती झिंटाने फटकारलं, म्हणाली...

IPL 2023 : अर्जुन तेंडुलकरला ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री प्रीती झिंटाने फटकारलं, म्हणाली...

Apr 19, 2023 06:50 PM IST

Preity Zinta On Trolling : सनरायझर्सविरुद्धच्या सामन्यात अर्जुनने एक विकेट घेतली होती. त्यानंतर शिवीगाळ केल्याचा आरोप करत अनेकांनी त्याला ट्रोल केलं होतं.

Preity Zinta On Arjun Tendulkar
Preity Zinta On Arjun Tendulkar (HT)

Preity Zinta On Arjun Tendulkar : आयपीएलच्या गेल्या तीन हंगामापासून संधी न मिळालेल्या अर्जुन तेंडुलकरला अखेर मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची संधी मिळली आहे. पदार्पणाच्या दुसऱ्याच सामन्यात अर्जुन तेंडुलकरने आयपीएलमधील पहिली विकेट घेतली आहे. त्यामुळं त्याचं अनेकांनी कौतुक केलं आहे. मुलाला पहिली विकेट घेतल्याचं पाहून सचिन तेंडुलकर भावूक झाल्याचा खुलासा माजी क्रिकेटर इयान बिशपने केला आहे. परंतु आता हैदराबादविरुद्धच्या सामन्यात कॅमेरामॅनला शिवीगाळ केल्याचा आरोप करत अनेकांनी अर्जुन तेंडुलकरला सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली आहे. याशिवाय काही लोकांनी फक्त घराणेशाहीमुळंच अर्जुन तेंडुलकरला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाल्याचा आरोप केला आहे. त्यामुळं ट्रोलर्सच्या आरोपांवर पंजाब किंग्जची मालक आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा चांगलीच संतापल्याचं पाहायला मिळालं आहे.

पंजाब किंग्जची मालकीण प्रीती झिंटाने एक ट्वीट करत आयपीएलमधील पहिली विकेट मिळवल्याबद्दल अर्जुन तेंडुलकरचं कौतुक केलं आहे. याशिवाय अनेकांनी अर्जुन तेंडुलकरची घराणेशाही सुरू असल्याचा आरोप करत खिल्ली उडवली पण आज रात्री त्याने आपली जागा चांगली कमावली आहे, त्याने चांगली कामगिरी करत स्वत:ला सिद्ध केल्याचं प्रीती झिंटाने म्हटलं आहे. अर्जुन तेंडुलकरला आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून संधी मिळाल्यानंतर अनेकांनी त्याला घराणेशाहीमुळं खेळायला मिळाल्याचा आरोप केला होता. त्या सर्वांना प्रीती झिंटाने चांगलंच फटकारलं आहे.

RR vs LSG IPL 2023 : आयपीएलमध्ये आज हायहोल्टेज सामना, राजस्थान आणि लखनौमध्ये रंगणार वर्चस्वाची लढत

मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा यंदाच्या आयपीएलमधून बाहेर झाला आहे. जोफ्रा आर्चरला पहिल्या सामन्यानंतर दुखापत झाल्यामुळं मुंबईच्या गोलंदाजीची धुरा कोण संभाळणार, असा प्रश्न उपस्थित होत असतानचा कर्णधार रोहित शर्माने अर्जुन तेंडुलकरला मैदानात उतरवलं आहे. अर्जुनने डावाच्या सुरुवातीलाच नव्या चेंडूने दमदार सुरुवात केली. याशिवाय अखेरच्या षटकातही तो चांगली गोलंदाजी करू शकतो, हे सिद्ध करून दाखवलं आहे. त्यामुळं त्याचं बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, माजी क्रिकेटर सौरव गांगुली आणि प्रीती झिंटा यांनी कौतुक केलं आहे.

Whats_app_banner