मराठी बातम्या  /  क्रीडा  /  आमिर खानला IPL मध्ये खेळायचंय; रवी शास्त्रींना म्हणाला, माझी...

आमिर खानला IPL मध्ये खेळायचंय; रवी शास्त्रींना म्हणाला, माझी...

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 21, 2022 01:31 PM IST

'मी ज्या संघात असेल, तो संघ खुपच भाग्यवान असेल, असे आमिर म्हणाला आहे.

आमिर खान आणि रवी शास्त्री
आमिर खान आणि रवी शास्त्री

आयपीएल २०२२ अंतिम टप्प्यात आहे. या दरम्यान, आमिर खान आणि टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या बाबतचा एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो आयपीएलमधील एका संघाकडून खेळण्याची संधी मागत आहे. हाच धागा पकडत या व्हिडिओमध्ये एका सुत्रसंचालकाने टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींना विचारले आहे की, ‘आयपीएलमध्ये आमिरला संधी मिळेल का’?  

त्यावर उत्तर देताना रवी शास्त्री म्हणाले की, "तो नेटमध्ये चांगला दिसतोय. पण त्याला त्याच्या फुटवर्कवर अधिक लक्ष द्यावे लागेल, पण त्याला कोणत्याही संघात संधी मिळू शकते."

 शास्त्रींच्या या प्रतिक्रियेला बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननेही प्रत्युत्तर दिले आहे. आमिर म्हणाला की, "रवी, तुम्हाला माझे फूटवर्क आवडले नाही, याबद्दल मी थोडा निराश आहे. मला वाटते की तूम्ही लगान पाहिला नाही, आता पुन्हा माझ्याकडे पाहा.. मला वाटते की मी ज्या संघात असेल, तो संघ खुपच भाग्यवान असेल... माझी शिफारस करा,  मजा येईल." हा मजेदार व्हिडिओ स्टार स्पोर्ट्सने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

अर्जुन तेंडुलकर आज आयपीएल पदार्पण करण्याची शक्यता-

दरम्यान, आमिर खानला संधी मिळेल की नाही हे माहिती नाही, मात्र आज सचिन तेंडुलकरचा पुत्र अर्जुनला आयपीएल पदार्पणाची संधी मिळू शकते. यंदाच्या मोसमातील मुंबई इंडियन्सचा शेवटचा सामना शनिवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. या सामन्यात डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुनला मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. अर्जून कधी एकदाचा मुंबई इंडियन्सकडून खेळेल, याची चाहत्यांना गेल्या दोन वर्षांपासून उत्सुकता लागून राहिली आहे. अर्जून तेंडुलकरला पाच वेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्सने गेल्या मोसमात २० लाख रुपयांना विकत घेतले होते, पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. तसेच, या मोसमातही त्याच्यासोबत असेच घडले आहे. मात्र, शनिवारच्या सामन्यात अर्जुनला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. 

WhatsApp channel

विभाग