9 Year Old Aarit Kapil Defeat Grandmaster : भारताच्या आरित कपिलने वयाच्या ९व्या वर्षी इतिहास रचला आहे. बुद्धिबळाच्या खेळात ग्रँडमास्टरला पराभूत करणारा आरित कपिल हा सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने क्लासिकल बुद्धिबळाच्या लढतीत अमेरिकेचा ग्रँडमास्टर रॅसेट झियात्दिनोव याचा पराभव केला.
दिल्लीच्या अरीत कपिल याचे वय ९ वर्षे, २ महिने आणि १८ दिवस आहे. त्याने भुवनेश्वर येथे झालेल्या आयआयटी इंटरनॅशनल ओपनमध्ये यूएस ग्रँडमास्टरचा पराभव केला. अरितने स्पर्धेच्या नवव्या फेरीदरम्यान हा विजय मिळवला.
गँगमास्टरला पराभूत करणारा सर्वात तरुण भारतीय ठरलेल्या आरित कपिलने जगातील या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे. जगातील सर्वात कमी वयात ग्रँडमास्टरला पराभूत करण्याचा विक्रम भारतीय वंशाच्या सिंगापूरच्या अश्वथ कौशिक याच्या नावावर आहे. अश्वथ कौशिकने वयाच्या ८ वर्षे ६ महिन्यांत पोलंडच्या जेसेक स्तूपाचा पराभव केला होता.
अश्वथ कौशिक (सिंगापूर) – ८ वर्षे २ महिने
लिओनिड इव्हानोविच (सर्बिया) - ८ वर्षे ११ महिने
अरीत कपिल (भारत) – ९ वर्षे २ महिने.
आरीत कपिल हा मुळचा दिल्लीचा आहे. तो शालेय बुद्धिबळ स्पर्धांमध्ये भाग घेतो. आरितच्या वडिलांचे नाव विजय कपिल आहे. अरितने ६१व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेतही भाग घेतला होता. आरितने आरपीएस इंटरनॅशनल स्कूल, गुरुग्राम येथे झालेल्या स्पर्धेतही भाग घेतला होता, ज्यामध्ये त्याने १८३ वा क्रमांक मिळविला होता.
विशेष म्हणजे, ग्रँड मास्टरचा पराभव करणाऱ्या आरित कपिलने यूथ चॅम्पियनशिपमध्ये दोन वेळा रौप्य पदक जिंकले आहे. याशिवाय त्याने राज्य चॅम्पियनचा किताबही पटकावला आहे.
वयाच्या अवघ्या ६ व्या वर्षी, आरितने अंडर-८ बॉईज दिल्ली स्टेट चेस चॅम्पियनशिपमध्ये त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठ्या मुलाला पराभूत करून राज्य स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.
संबंधित बातम्या