मराठी बातम्या  /  क्रीडा  /  कतारमध्ये रंगणार २०२३ एएफसी आशियाई चषक स्पर्धा; येथे पाहा संघ, गट आणि संपूर्ण वेळापत्रक!

कतारमध्ये रंगणार २०२३ एएफसी आशियाई चषक स्पर्धा; येथे पाहा संघ, गट आणि संपूर्ण वेळापत्रक!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 05, 2024 08:00 PM IST

2023 AFC Asian Cup: २०२३ एएफसी आशियाई चषक स्पर्धा यंदा कतारमध्ये रंगणार आहे. येत्या १२ जानेवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होईल.

2023 AFC Asian Cup
2023 AFC Asian Cup

Asian Football Cup 2023: कतारमध्ये १२ जानेवारीपासून २०२३ एएफसी आशियाई चषकाला सुरुवात होत असून आशियातील फुटबॉल प्रेमींना स्पर्धेची मोठी उत्सुकता लागली आहे. २०२३ एएफसी आशियाई चषक स्पर्धेची ही १८वी आवृत्ती असेल. या स्पर्धेत एकूण २४ संघ सहभागी होतील, जे सहा गटांमध्ये विभागले जातील. कतारमधील उच्च उन्हाळ्याच्या तापमानामुळे आणि २०२३ च्या कॉनकाकाफ गोल्ड कपमधील सहभागामुळे ही स्पर्धा १२ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२४ पर्यंत पुढे ढकलण्यात आली होती.

दरम्यान, २०१९ च्या यजमान पदाच्या लिलावात चीनने बाजी मारली. परंतु, कोरोना महामारीमुळे चीनने आपले यजमानपद गमावले आणि पुन्हा लिलाव करण्यात आला. या लिलावात कतारने मोठी बोली लावली.

पात्र संघ

चीन, जपान, सीरिया, कतार, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, इराण, सौदी, अरेबिया, संयुक्त अरब, अमिराती, इराक, ओमान, व्हिएतनाम, लेबनॉन, पॅलेस्टाईन, उझबेकिस्तान, थायलंड, भारत, हाँगकाँग, ताजिकिस्तान, किर्गिस्तान, बहरीन, मलेशिया, जॉर्डन आणि इंडोनेशिया अशा एकूण २४ संघांनी २०२३ एएफसी आशियाई चषकासाठी पात्रता मिळवली.

 

कोणत्या गटात कोणता संघ?

गट अ: कतार, चीन, ताजिकिस्तान, लेबनॉन.

गट ब: ऑस्ट्रेलिया, उझबेकिस्तान, सीरिया, भारत.

गट क: इराण, संयुक्त अरब अमिराती, हाँगकाँग, पॅलेस्टाईन.

गट ड: जपान, इंडोनेशिया, इराक, व्हिएतनाम.

 

उद्घाटन सोहळा कधी?

२०२३ एएफसी आशियाई चषकाचा उद्घाटन सोहळा १२ जानेवारी रोजी लुसेल स्टेडियमवर होणार असून त्याला 'द लॉस्ट चॅप्टर ऑफ केलीलेह अँड डेमनेह' असे नाव देण्यात आले आहे. २०२३ एएफसी आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेसाठी ३३ रेफरी, ३७ सहाय्यक रेफरी, दोन स्टँडबाय रेफरी आणि दोन स्टँडबाय सहाय्यक रेफरी, दोन महिला रेफरी आणि तीन महिला सहाय्यक रेफरी असतील. संपूर्ण स्पर्धेसाठी व्हीएआरचा वापर केला जाईल.

लाईव्ह स्ट्रिमिंग

२०२३ एएफसी आशियाई चषक क्रिकेट स्पर्धेचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स १८ नेटवर्कच्या माध्यमातून भारतातील थेट दूरचित्रवाणीवर केले जाणार आहे. दरम्यान, जिओसिनेमावर याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.

WhatsApp channel

विभाग