भारतात चांदीचा आजचा भाव भारत हा चांदीचा सर्वात मोठा ग्राहक आहे. तसेच, चांदी आयात करणारा एक प्रमुख देश आहे. औद्योगिक वापराशिवाय चांदीचा वापर दागिने बनविण्यासाठी देखील केला जातो. भारतात सोन्याप्रमाणेच चांदीलाही मोठी मागणी असते. ही मागणीच चांदीचे दर ठरविण्यास मदत करते. आयात कर व अन्य करांबरोबरच जागतिक बाजारातील दर देखील देशातील चांदीच्या दरावर परिणाम करत असतात. सोन्याप्रमाणे चांदीकडेही गुंतवणुकीचा एक आकर्षक पर्याय म्हणून पाहिले जाते. भारतातील प्रमुख शहरांतील चांदीचे दर (Silver Prices in India Today) खालीलप्रमाणे...
भारत हा चांदीचा सर्वात मोठा ग्राहक आहे. तसेच, चांदी आयात करणारा एक प्रमुख देश आहे. औद्योगिक वापराशिवाय चांदीचा वापर दागिने बनविण्यासाठी देखील केला जातो. भारतात सोन्याप्रमाणेच चांदीलाही मोठी मागणी असते. ही मागणीच चांदीचे दर ठरविण्यास मदत करते. आयात कर व अन्य करांबरोबरच जागतिक बाजारातील दर देखील देशातील चांदीच्या दरावर परिणाम करत असतात. सोन्याप्रमाणे चांदीकडेही गुंतवणुकीचा एक आकर्षक पर्याय म्हणून पाहिले जाते. भारतातील प्रमुख शहरांतील चांदीचे दर (Silver Prices in India Today) खालीलप्रमाणे
Silver is cheaper than Gold : चांदी ही सोन्यापेक्षा स्वस्त असते. उदाहरणार्थ, एक ग्रॅम चांदीचा भाव (Silver Rates) आज ६१.४० असेल तर तुम्ही ६१,४०० रुपयांत एक किलो चांदी खरेदी करू शकता. मात्र, एवढ्याच किंमतीत तुम्हाला जेमतेम १० ग्रॅम सोने मिळू शकते. सोने व चांदीच्या दरातील फरक हा असा आहे.
Silver Demand: सुवर्णकार आणि उद्योगांमध्ये सोन्यापेक्षा चांदीला जास्त मागणी असते. कारण, चांदीचा वापर केवळ दागिने घडविण्यासाठी होतो असे नाही. विविध उत्पादनांच्या निर्मितीत चांदीचा वापर केला जातो. चांदीला मोठी मागणी असल्यामुळं या धातूचे साठे झपाट्याने कमी होत आहेत. त्यामुळेच तुम्ही आज चांदीमध्ये गुंतवणूक (Silver Investment) केलेली असेल तर दर वाढल्यानंतर तुम्हाला मोठा फायदा (Benefits of Investment in Silver) मिळू शकतो.
How Silver Price decided in India: भारतात चांदीची किंमत विविध घटकांद्वारे निर्धारित केली जाते. त्यात सोन्याच्या किंमतींचाही समावेश होतो. सोन्याचे दर वाढले की चांदीचे दरही वाढल्याचे पाहायला मिळते. याशिवाय, मोठ्या प्रमाणावर खरेदी करूनही चांदीच्या किंमतींवर प्रभाव टाकता येतो.
Silver Purchase: चांदीची खरेदी बँका, ज्वेलर्स किंवा ऑनलाइन एजंट्सच्या माध्यमातून करता येते. बँकेकडून चांदी खरेदी करताना तिचे दर जास्त असतात, कारण बँकेकडून घेतलेल्या सोन्याच्या शुद्धतेची तपासणी केलेली असते. खरेदीदाराला चांदीच्या दर्जाची हमी मिळते. चांदी ही ज्वेलर्स आणि ऑनलाइन एजंटच्या माध्यमातून देखील खरेदी करता येऊ शकते.
Purity of Silver: उत्तम चांदी ही ९९९.९, ९९९.५ किंवा ९९९ शुद्धता श्रेणीत मिळते. चांदीमिश्रीत धातू, दागिने किंवा अन्य वस्तूंसाठी शुद्धता श्रेणी ९७०, ९२५, ९०० आणि ८३५ असते. चांदी ही कधीही तिच्या नैसर्गिक स्वरूपात वापरली जात नाही. सुवर्णकार दागिने बनविण्यासाठी स्टर्लिंग चांदीचा वापर करतात. त्यात ९२.५ टक्के चांदी आणि ७.५ टक्के इतर धातू असतात. भारतीयांच्या मागणीची पूर्तता करण्याइतपत चांदी भारतात नसल्यामुळं ही गरज आयातीतून भागवली जाते. झारखंड, गुजरात व राजस्थान या राज्यांत काही प्रमाणात चांदी मिळते.
Import Duty on Silver : भारतात सध्या सोन्याच्या आयातीवर १० टक्के शुल्क आकारले जाते. केंद्र सरकार गरजेनुसार या शुल्कात बदल करत असते. आयातीवर अंकुश ठेवण्यासाठी यात बदल केला जातो. भारत हा चीन, युनायटेड किंगडम, युरोपियन युनियन, ऑस्ट्रेलिया आणि दुबई येथून चांदीची आयात करतो.
Friday, September 27, 2024
Wednesday, September 25, 2024
Tuesday, September 24, 2024
Monday, September 23, 2024
Friday, September 20, 2024
चांदीमध्ये गुंतवणूक करण्याची अनेक कारणे आहेत. मौल्यवान धातू असल्याने भारतातील दागिन्यांच्या बाजारपेठेत चांदीला नेहमीच मागणी असते. मोठ्या मागणीमुळे चांदीची उपलब्धता कमी होत आहे. जसजशी टंचाई वाढेल, तसतसे चांदीचे दर वाढत जातील आणि गुंतवणूकदारांना यातून मोठा फायदा मिळू शकेल. चांदी ही सोन्यापेक्षा स्वस्त आहे. त्यामुळे त्यात गुंतवणूक करणे तुलनेने स्वस्त आहे.
भारतात चांदीची किंमत ही सोन्याचे भाव, उद्योग क्षेत्रातून असलेली मागणी, एकगठ्ठा खरेदी व महागाई अशा काही गोष्टींच्या आधारे ठरवली जाते. सोन्याचे भाव वाढले की चांदीचे भावही वाढतात. विविध कंपन्या दागिने, नाणी व पदके अशा वस्तूंच्या निर्मितासाठी चांदीचा वापर करतात. याशिवाय, मोठ्या प्रमाणावर खरेदी व विक्री करूनही चांदीच्या दरावर कृत्रिमरित्या बदल करता येऊ शकतो.
चांदी ही बँका, ज्वेलर्स आणि ऑनलाइन एजंट्सच्या माध्यमातून खरेदी करता येते. बँकेकडून चांदी खरेदी करताना तिचे दर जास्त असतात, कारण बँकेकडून घेतलेल्या सोन्याच्या शुद्धतेची तपासणी केलेली असते. खरेदीदाराला चांदीच्या दर्जाची हमी मिळते. ज्वेलर्सकडून चांदी वजनाच्या प्रमाणात वेगवेगळ्या दरांत मिळते. याशिवाय, काही ऑनलाइन कंपन्यांच्या माध्यमातून देखील खरेदी करता येऊ शकते.
उत्तम चांदीची शुद्धता श्रेणी ९९९.९, ९९९.५ किंवा फक्त ९९९ असते. चांदीमिश्रीत धातू, दागिने किंवा अन्य वस्तूंसाठी शुद्धता श्रेणी ९७०, ९२५, ९०० आणि ८३५ ही आहे.
चांदी ही कधीही तिच्या नैसर्गिक स्वरूपात वापरली जात नाही. सुवर्णकार दागिने बनविण्यासाठी स्टर्लिंग चांदीचा वापर करतात. यात ९२.५ टक्के चांदी आणि ७.५ टक्के अन्य धातूचं मिश्रण असतं.