Yogini Ekadashi 2024 Vrat Puja Time : निर्जला एकादशीनंतर येणाऱ्या एकादशीला योगिनी एकादशी म्हणतात. हिंदू कॅलेंडरनुसार, योगिनी एकादशी ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षात येते. यावर्षी योगिनी एकादशी २ जुलै 2024 रोजी आहे. धार्मिक मान्यतेनुसार योगिनी एकादशीचे व्रत केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनात सुख-समृद्धी येते. योगिनी एकादशीचे व्रत ८८ हजार ब्राह्मणांना भोजन देण्यासारखे आहे असे मानले जाते.
एकादशी तिथी १ जुलै २०२४ रोजी सकाळी १० वाजून २६ मिनिटांनी सुरू होईल आणि २ जुलै २०२४ रोजी सकाळी ८ वाजून ४२ मिनिटांनी समाप्त होईल. योगिनी एकादशीच्या दिवशी त्रिपुष्कर योग आणि सर्वार्थ सिद्धी योग यांचा शुभ संयोग होत आहे. त्रिपुष्कर योग दुसऱ्या दिवशी ३ जुलै रोजी सकाळी ८:४२ ते ४:४० पर्यंत राहील. सर्वार्थ सिद्धी योग सकाळी ५:२७ ते दुसऱ्या दिवशी पहाटे ४:४० पर्यंत राहील.
ज्योतिषशास्त्रात राहुकाळ, गुलिक काळ, यमगंड, विदल योग आणि दुमुहूर्त हे अशुभ मुहूर्त मानले जातात. असे मानले जाते की या काळात पूजा केल्याने कोणतेही फळ मिळत नाही.
राहुकाळ- दुपारी ३:५३ ते संध्याकाळी ५:३८ पर्यंत
यमगंड- सकाळी ८:५५ ते सकाळी १०:४०
गुलिक काळ- दुपारी १२:२४ ते दुपारी २:०९
विदल योग - ३ जुलै पहाटे ४:४० ते ५:२७ पर्यंत
दुर्मुहूर्त- सकाळी ०८:१४ ते सकाळी ९:०९
एकादशीच्या व्रताच्या समाप्तीला पारण म्हणतात. दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर एकादशी व्रताचा उपास सोडला जातो. द्वादशी तिथी संपण्यापूर्वी व्रत सोडणे फार शुभ असते असे म्हणतात.
योगिनी एकादशीचा उपास सोडण्याची शुभ वेळ : ३ जुलै रोजी सकाळी ५ वाजून २७ मिनिटे ते ७ वाजून १० मिनिटापर्यंत असेल.
शास्त्रामध्ये एकादशीला हरिवासर असेही म्हणतात. वेदांमध्ये सांगितले आहे की प्रत्येक वर्षभरात परमेश्वराला समर्पित काही खास दिवस असतात. या परमेश्वरास समर्पित दिवसांना हरिवासर असे म्हणतात. हरि भगवान विष्णूच्या नावांपैकी एक नाव आहे आणि वासर म्हणजे दिवस होय. त्यामुळे असे सांगितले जाते की, एकादशीचे व्रत हरिवासर दरम्यान कधीही सोडू नये. हरिवासर म्हणजे भगवान विष्णूचा दिवस होय.
संबंधित बातम्या