मराठी बातम्या  /  धर्म  /  जगातील पहिलं ॐ आकाराचं मंदीर तयार, बांधायला २८ वर्षे लागली; या दिवशी प्रतिष्ठापणा, खासियत काय? पाहा

जगातील पहिलं ॐ आकाराचं मंदीर तयार, बांधायला २८ वर्षे लागली; या दिवशी प्रतिष्ठापणा, खासियत काय? पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 09, 2024 05:17 PM IST

Om Shaped Temple : ॐ च्या आकारात बांधलेले हे मंदीर राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील मारवाड तालुक्यातील जडन गावात आहे. हे मंदिर अतिशय भव्य आणि पूर्णपणे महादेवाला समर्पित आहे. या मंदिराशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी आणि त्याची वैशिष्ट्ये जाणून घेऊया.

Om Shaped Temple
Om Shaped Temple

Om Shaped Temple rajasthan : भारत हा जगातील प्रमुख देश आहे. आपल्या देशात अशी अनेक भव्य आणि पाहण्यासारखी मंदिरे आहेत. या मंदिरांना पाहण्यासाठी लाखो भाविक दररोज येतात. भारतात लाखो शिवमंदिरे आहेत, पण भारतात कालपर्यंत ॐ आकाराचे मंदिर नव्हते, पण आता ते स्वप्नही पूर्ण झाले आहे. होय, जगातील पहिले ॐ या आकाराचे मंदिर राजस्थानमध्ये तयार झाले आहे.

ॐ च्या आकारात बांधलेले हे मंदीर राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील मारवाड तालुक्यातील जडन गावात आहे. हे मंदिर अतिशय भव्य आणि पूर्णपणे महादेवाला समर्पित आहे. या मंदिराशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी आणि त्याची वैशिष्ट्ये जाणून घेऊया.

विशेष म्हणजे, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे मंदिर बांधण्यासाठी २८ वर्षे लागली. या मंदिराचे भूमिपूजन १९९५ सालीच झाले होते. 

मंदिरात या दिवशी होणार प्राण प्रतिष्ठापणा

मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आता या मंदिरात ठेवलेल्या मूर्तींची प्राण प्रतिष्ठापणा १९ फेब्रुवारी २०२४ रोजी होणार आहे. मंदिराच्या प्रतिष्ठापणेसाठी १० फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी या कालावधीत येथे शिवपुराण कथेचे पठण होणार आहे. मंदिराच्या अभिषेकासाठी देशभरातून ऋषी-मुनींसह भाविक येणार आहेत.

ॐ आकाराच्या मंदिराची मुख्य वैशिष्ट्ये

ॐ आकाराचे मंदीर असावे, असे स्वप्न श्री अलखापुरी सिद्धपीठ परंपरेचे पीठाधीश्वर महामंडलेश्वर महेश्वरानंद महाराज यांनी ४० वर्षांपूर्वी पाहिले होते.

ॐ आकाराच्या या मंदिराचा परिसर २५० एकराचा आहे. मंदिरात १२ ज्योतिर्लिंगे, भगवान शंकराच्या १००८ फोटो आणि १०८ कक्ष आहेत.

मंदिर नागर शैलीत बांधण्यात आले आहे. सोबतच उत्तर भारतीय वास्तुकलेचीही झलक दिसते. शिवमंदिर असण्याबरोबरच येथे ७ ऋषींच्या समाधीही आहेत.

ॐ आकाराच्या या मंदिराचे शिखर १३५ फूट उंच आहे. मंदिराच्या शिखरावर शिवलिंग असून त्यावर विश्वाचा आकार कोरलेला आहे.

मंदिराच्या बांधकामात राजस्थानच्या बन्सी पहारपूर येथील दगडांचा वापर करण्यात आला आहे. हे एक प्रकारचे लाल दगड आहेत आणि त्यांचे आयुष्य अनेक हजार वर्षे आहे.

यासोबतच या योग मंदिरात नंदी महाराजांची भव्य मूर्तीही बसवण्यात आली असून, अष्टखंडात सूर्यदेवाचे मंदिरही आहे.

हे शिवमंदिर ४ भागात विभागलेले असून त्यातील एक भाग भूमिगत असून उर्वरित तीन भाग जमिनीच्या वर बांधलेले आहेत. मंदिराच्या मध्यभागी स्वामी माधवानंदांची समाधी आहे.

WhatsApp channel

विभाग