Narak Chaturdashi 2023 Importance and Muhurat : हिंदू धर्मानुसार दरवर्षी आश्विन महिन्याच्या चतुर्दशीला छोटी दिवाळी साजरी केली जाते. यावर्षी नरक चतुर्दशी किंवा छोटी दिवाळी ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी गुरुवारी आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध करून सुमारे १६ हजार स्त्रियांची मुक्तता केली, असे मानले जाते. त्यामुळे हा दिवस दीप प्रज्वलन करून साजरा केला जातो. यासोबतच या दिवशी लोक यमदेवासाठी दिवा लावून कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात.
नरक चतुर्दशी शुभ वेळ :
चतुर्दशी तिथी ३० ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १ वाजून १६ मिनिटांनी प्रारंभ होईल आणि ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजून ५२ मिनिटांनी समाप्त होईल.
उदया तिथीनुसार ३१ ऑक्टोबर रोजी छोटी दिवाळी म्हणजेच नरक चतुर्दशी साजरी केली जाईल.
काय आहे नरक चतुर्दशीचे महत्त्व :
नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी असेही म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार चतुर्दशीचे व्रत करणाऱ्यांची सर्व पापे नष्ट होतात. या दिवशी उपवास केला जातो. संध्याकाळी उपवास सोडला जातो.
नरक चतुर्दशी अभ्यंग स्नान मुहूर्त -
५ वाजून २० मिनिटापासून ते ६ वाजून ३२ मिनिटापर्यंत
कालावधी - १ तास १३ मिनिटे
काली चौदस पूजा -
कालीचौदसच्या दिवशी काली देवीची पूजा करण्यापूर्वी अभ्यंगस्नान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. असे मानले जाते की असे केल्याने व्यक्तीला सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते. या दिवशी देवी कालीची पूजा करण्यापूर्वी स्नान करून अत्तर लावावे आणि पूजेला बसावे. त्यानंतर, चौरंगावर लाल रंगाचे कापड पसरवा. त्यावर काली मातेची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा. नंतर दिवा लावावा. त्यानंतर काली मातेला फळे, फुले, कुंकू, हळद, कापूर, नारळ आणि नैवेद्य अर्पण करा. शेवटी, काली चालिसाचे पठण करा आणि मंत्राचा जप करा.
नरक चतुर्दशीच्या दिवशी किती दिवे लावले जातात :
नरक चतुर्दशीच्या दिवशी १४ दिवे लावले जातात. संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो.
नरक चतुर्दशीच्या दिवशी काय करू नये :
नरक चतुर्दशीला मृत्यूची देवता यमराजाची पूजा केली जाते. त्यामुळे या दिवशी कोणत्याही जीवाची हत्या करू नये. यासोबत घराची दक्षिण दिशा अस्वच्छ करू नये.
नरक चतुर्दशीला कोणाची पूजा करतात :
नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण, यमराज आणि धनाची देवी लक्ष्मी यांची पूजा केली जाते. नरक चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते.
संबंधित बातम्या