Why Should Not Wear Black in Auspicious Functions : हिंदू धर्मात लग्न किंवा सण समारंभ अशा कोणत्याही शुभ प्रसंगी काळे किंवा गडद रंगाचे कपडे परिधान करत नाहीत, असे कपडे परिधान करणे अशुभ मानले जाते. पण अनेकांना काळ्या रंगाचे कपडे प्रिय असतात.
दरम्यान, आपण या ठिकाणी कोणत्याही शुभ कार्यात काळे कपडे परिधान करणे अशुभ का मानले जाते? ते जाणून घेणार आहोत.
धार्मिक मान्यतांनुसार, काळा आणि गडद रंग दुर्दैवी मानला जातो. या रंगाकडे नकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले जाते. त्यामुळे असे मानले जाते, की काळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने जीवनात वाईट परिणाम होतात आणि व्यक्तीच्या प्रगतीतही बाधा येते. त्याचबरोबर वास्तुशास्त्रातही घरात काळे कपडे घालणे निषिद्ध मानले गेले आहे.
लग्नात अडथळे येत असतील तर हे उपाय करा, मनासारखा जोडीदार मिळेल
सोबतच, अशीही मान्यता आहे की, काळे कपडे घालणारे लोक नकारात्मकतेने भरलेले असतात. काळा रंग सामान्यतः शोकाशी संबंधित आहे. त्याचबरोबर ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीकोनातून काळा रंग हा राहू आणि शनीचा रंग मानला जातो. अशा परिस्थितीत, जो व्यक्ती काळ्या रंगाचे कपडे परिधान करतो त्याला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
वैज्ञानिक दृष्टिकोनातून, काळा रंग उष्णता शोषक आहे. तसेच, हा रंग त्याच्या सभोवतालची ऊर्जा शोषून घेऊ शकतो. उन्हाळ्यात काळ्या रंगाचे कपडे घातल्यास ते जास्त उष्णता शोषून घेतात, जे आरोग्याच्या दृष्टिकोनातून गंभीर आहे.
त्याचबरोबर मानसशास्त्रानुसार, ज्या लोकांना काळा रंग आवडतो त्यांना मानसिक शांती मिळत नाही. ते त्यांच्या सभोवतालची सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)