मराठी बातम्या  /  धर्म  /  Lord Hanuman : हनुमानाला या दिवशी सिंदूर अर्पण करा, आयुष्यात काहीच कमी पडणार नाही

Lord Hanuman : हनुमानाला या दिवशी सिंदूर अर्पण करा, आयुष्यात काहीच कमी पडणार नाही

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 01, 2024 08:37 PM IST

Lord Hanuman Sindoor Puja : रामभक्त हनुमानजींना सिंदूर अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात.

Lord Hanuman
Lord Hanuman (PTI)

हिंदू धर्मात भगवान रामासोबत हनुमानालाही खूप मानले जाते. हनुमानाच्या आशीर्वादामुळे व्यक्तीला जीवनात संकटांचा सामना करावा लागत नाही. हनुमानजींच्या पूजेदरम्यान त्यांना सिंदूर अर्पण केला जातो. हिंदू धर्मात अशी मान्यत आहे, की हनुमानाला सिंदूर अर्पण केल्याने भक्तांना आयुष्यात अनेक लाभ मिळतात.

हनुमानाला सिंदूर लावल्याने कोणते फायदे होतात?

रामभक्त हनुमानजींना सिंदूर अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. विशेषत: मंगळवारी हनुमानजींना सिंदूर अर्पण करणे अधिक फायदेशीर मानले जाते. असे केल्याने साधकाचे रखडलेले काम हळूहळू पूर्ण होऊ लागते. बजरंगबलीजींना सिंदूर अर्पण केल्याने व्यक्तीला शक्ती आणि बुद्धिमत्ता देखील प्राप्त होते.

हनुमानजींच्या उजव्या खांद्यावर लावा सिंदूर तिलक

मंगळवारी मंदिरात जाऊन हनुमानजींच्या उजव्या खांद्यावर सिंदूर तिलक लावावा. तुम्हाला हवे असल्यास चमेलीच्या तेलात सिंदूर मिसळून ते मंगळवारी बजरंगबलीजींना अर्पण करावे. असे केल्याने साधकाला बजरंगबलीजींचा विशेष आशीर्वाद मिळतो. पण लक्षात ठेवा हनुमानजींना फक्त केशरी सिंदूर अर्पण करावा.

हनुमानाला सिंदूर का लावला जातो?

हिंदू धर्मात सिंदूर हे सौभाग्याचे लक्षण मानले जाते. तर हनुमानजी हे ब्रह्मचारी आहेत. अशा स्थितीत तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की हनुमानजींना सिंदूर का अर्पण केला जातो? 

या मागील पौराणिक कथा अशी आहे, की एकदा हनुमानजींनी माता सीतेला कपाळावर सिंदूर लावताना पाहिले. यानंतर हनुमानाने सीतेला याचे कारण विचारले.

यावर उत्तर देताना सीताजी म्हणाल्या की, सिंदूर लावल्याने पतीचे आयुष्य वाढते. यावर हनुमानजींनी आपल्या संपूर्ण अंगावर सिंदूर लावला, जेणेकरून प्रभू राम अमर होतील. तेव्हापासून हनुमानजींना सिंदूर अर्पण करण्याची परंपरा सुरू आहे.

 

 

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel