Chaitra Navratri 2023 : नवरात्रीत कलशाची पूजा का केली जाते?, जव पेरण्याचं नेमकं कारण काय?
Importance Of Kalash Poojan On Chaitra Navratri : चैत्र नवरात्रीतही कलशाची स्थापना करून आपण शैलपुत्रीच्या पूजेने नऊदेवींच्या पूजनाची सुरूवात करणार आहोत. मात्र कोणत्याही शुभ कार्यात नेमका कलश का पूजला जातो, पहिलं धान्य म्हणून जव का पेरतात,अखंड ज्योत का लावली जाते हे माहिती आहे का?
चैत्र नवरात्र २२ मार्च ते ३० मार्च २०२३
ट्रेंडिंग न्यूज
चैत्र नवरात्र आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. चैत्र नवरात्रीत आपण दुर्गा मातेच्या नऊ रुपांची पूजा करणार आहोत. मात्र प्रत्येक पूजेत कलश स्थापना केली जात असल्याचं आपण पाहिलं असेल. मग कलश स्थापनेचं नेमकं महत्व काय आहे. चैत्र नवरात्रीतही कलशाची स्थापना करून आपण शैलपुत्रीच्या पूजेने नऊदेवींच्या पूजनाची सुरूवात करणार आहोत. मात्र कोणत्याही शुभ कार्यात नेमका कलश का पूजला जातो, पहिलं धान्य म्हणून जव का पेरतात,अखंड ज्योत का लावली जाते हे आपण पाहूया.
नवरात्रीत का केलं जातं कलश पूजन?
चैत्र नवरात्रीत कलशाची स्थापना करणे शुभ मानले जाते. शास्त्रानुसार असे मानले जाते की कोणत्याही शुभ किंवा शुभ कार्यात कलशाची स्थापना केल्याने सुख-समृद्धी मिळते आणि धन-धान्याची कमतरता नसते. कलश हे देवता, तीर्थक्षेत्रे, पावन नद्या इत्यादींचे प्रतीक मानले जाते. कलशाच्या मुखात श्रीविष्णू, कंठात महादेव आणि मुळात ब्रह्मदेव निवास करतात. यासोबतच कलशाच्या मध्यभागी दैवी मातृशक्तींचा वास असतो.
नवरात्रीत जव का पेरलं जातं?
शास्त्रानुसार जव (बार्ली) हे विश्वाचे पहिले पीक मानले जाते. त्यामुळेच, नवरात्रीमध्ये दुर्गेची पूजा करण्यापूर्वी कलशाखाली मातीमध्ये जव पेरलं जातं. हे जव नवरात्रीत जेवढे बहरून येतील तितकीच माणसाला सुख, समृद्धी, संपत्ती आणि नशीब प्राप्त होते असं मानलं जातं.
चैत्र नवरात्रीत अखंड ज्योत लावण्यामागचं कारण काय?
चैत्र नवरात्रीत संपूर्ण नऊ दिवस अखंड जळणाऱ्या तुपाच्या दिव्याला अखंड ज्योती म्हणतात. व्रताचा संकल्प घेऊन ही ज्योत प्रज्वलित केली जाते. अखंड ज्योती प्रज्वलित केल्याने माता दुर्गेचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो असं मानलं जातं.
चैत्र नवरात्रीमध्ये कुमारीकांना का खाऊ घातलं जातं?
चैत्र नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी तिथीला, बहुतेक लोक मुलींना त्यांच्या घरी बोलावतात आणि त्यांची विधिवत पूजा करून त्यांना अन्नदान करतात आणि त्यांच्या क्षमतेनुसार भेटवस्तू देतात. मुलींची संख्या विषम असते, म्हणजेच घरी जेवायला बोलावलेल्या मुली १,३,५,७ अशा संख्येत असतात. भागवत पुराणानुसार, माता दुर्गा फक्त होम हवन आणि जपजाप करून प्रसन्न होत नाही तर मुलींना घरी बोलवून त्यांना प्रेमाने खाऊ घातल्यानेही दुर्गा माता प्रसन्न होते.