मराठी बातम्या  /  धर्म  /  Astrology : मांजर कोणत्या देवाचे वाहन आहे? स्वप्नात मांजर दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या

Astrology : मांजर कोणत्या देवाचे वाहन आहे? स्वप्नात मांजर दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 08, 2024 04:51 PM IST

Omens related to Cat : स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात पांढरी मांजर दिसणे शुभ मानले जात नाही. स्वप्नात मांजर दिसल्यानंतर तुमच्यासोबत काहीतरी वाईट घडू शकते.

Astrology : मांजर कोणत्या देवाचे वाहन आहे? स्वप्नात मांजर दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या
Astrology : मांजर कोणत्या देवाचे वाहन आहे? स्वप्नात मांजर दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या

धार्मिक मान्यतांनुसार अनेक प्राणी-पक्षी शुभ आणिअशुभ मानले जातात. मांजर देखील यापैकी एक आहे. मांजराबाबत अनेक समजुती प्रचलित आहेत. अनेकांना घरात मांजर पाळणे आवडते तर अनेकांना आवडत नाही. अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीला मांजरीपासून कोणते संकेत मिळू शकतात हे जाणून घेऊया.

मांजर या देवतेचे वाहन आहे

मांजर ही देवी लक्ष्मीची बहीण अलक्ष्मीचे वाहन मानले जाते. शास्त्रात अलक्ष्मीला दारिद्र्याची देवी मानण्यात आले आहे. काही मान्यतांनुसार मांजर हे राहूचे वाहन देखील मानले जाते. ज्योतिषशास्त्रात राहुला अशुभ ग्रह मानले जाते. राहू आणि अलक्ष्मीमुळे जीवनात अडचणी येतात. याच कारणामुळे मांजरीचा संबंध अशुभतेशी जोडला जातो.

स्वप्नात मांजर दिसणे

स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात पांढरी मांजर दिसणे शुभ मानले जात नाही. स्वप्नात मांजर दिसल्यानंतर तुमच्यासोबत काहीतरी वाईट घडू शकते, असे मानले जाते. त्याच वेळी, स्वप्नात दोन मांजरी भांडताना दिसणे देखील अशुभ मानले जाते. याचा अर्थ तुमचे तुमच्या जवळच्या व्यक्तीशी भांडण होऊ शकते.

रस्त्यात मांजर आडवी आली तर

जर तुम्ही घरातून काही कामासाठी निघालात आणि वाटेत एखादी मांजर तुमच्या समोरून गेली तर ते अशुभ चिन्ह मानले जाते. त्यामुळे तुमच्या कामात अडथळे निर्माण होऊ शकतात असे मानले जाते. अशा परिस्थितीत, मांजर निघून गेल्यानंतर पुढे जाण्याआधी काही काळ तिथेच थांबावे आणि त्यानंतर पुढे जावे.

मांजरीचे रडणे

ज्योतिषशास्त्रात मांजरीचे रडणेदेखील शुभ मानले जात नाही. जर तुम्ही काही महत्त्वाचे काम करण्यासाठी जात असाल आणि तुम्हाला मांजरीचे रडणे ऐकू येत असेल तर ते अशुभ लक्षण मानले जाते. म्हणजे तुमच्या कामात व्यत्यय येऊ शकतो.

 

 

 

 

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel