हिंदू धर्मातल्या वेद पुराणांमध्ये अनेक प्रकारचे दाखले दिले गेले आहेत. लग्न सराईचे दिवस असले की एकमेकांच्या म्हणजे नवरा आणि नवरीच्या कुंडली जुळवून पाहिल्या जातात. कुंडलीतले गुण जुळले की लग्न निश्चिती होते, मात्र कुंडली जुळवण्यापूर्वीच तुमचं गोत्र कोणतं असा प्रश्न अगदी आवर्जुन विचारला जातो आणि दुर्देवाने गोत्र एकच असेल तर मात्र दोन्ही पक्ष लग्नाला तयार होत नाहीत.
आजकाल गोत्र पाहाणं, पत्रिका जुळवणं या गोष्टी काही लोकं पाहात नाहीत. मात्र पत्रिका न पाहिल्याचे किंवा एकाच गोत्रात लग्न केल्याचे दुष्परिणाम नंतर या व्यक्तींना भोगावे लागतात. आता एक प्रश्न तुमच्या मनात येत असेल तो म्हणजे गोत्र का विचारलं जातं?, किंबहुना गोत्र म्हणजे काय? याची माहितीही अनेकांना असेल असं वाटत नाही. चला तर आधी गोत्र म्हणजे काय हे जाणून घेऊया.
ज्योतिषशास्त्रानुसार गोत्र ही सप्तर्षींच्या वंशजांच्या रूपात मानली गेली आहेत. सप्तर्षी - गौतम, कश्यप, वशिष्ठ, भारद्वाज, अत्री, अंगिरस, मृगु. गोत्रांची मान्यता वैदिक काळापासून सुरू झाली होती.
सरळ साध्या शब्दात सांगयचं झालं तर गोत्र घरात एकमेकांशी लग्न टाळण्यासाठी बनवली गेलेली एक पद्धती आहे. एकाच रक्ताच्या व्यक्तींनी एकत्र येऊन लग्न करू नये यासाठी गोत्र व्यवस्था बनवली गेली होती आणि आजही त्याच पद्धतीचं पालन केलं जातं.
एकाच गोत्रात जन्माला आलेला मुलगा आणि मुलगी यांचं नातं भाऊबहिणीचं नातं मानलं जातं. याचं कारण असं की, एकाच गोत्रात असलेल्यांचा रक्तगट सारखा असतो. मुलगा आणि मुलगी यांनी एकाच गोत्रात लग्न केल्यास मूल होण्यात अडथळे येतात आणि गर्भात जनुकीय विकृती निर्माण होते. म्हणजे मुलामध्ये मानसिक किंवा शारीरिक किंवा दोन्ही प्रकारची विकृती असू शकते.
हिंदू धर्मात किमान तीन गोत्र सोडून लग्न करायची अनुमती दिली गेली आहे. पहिलंं वडीलांचं गोत्र, दुसरं आईचं गोत्र आणि तिसरं आजी म्हणजेच वडीलांच्या आईचं गोत्र. ही गोत्र सोडून इतर कोणत्याही गोत्रात लग्न करायला अनुमती दिली गेली आहे.
संबंधित बातम्या