Tilak On Forehead: कपाळावर टिळा का लावतात? हे आहेत फायदे, तुम्हीही रोज लावायला सुरू कराल!
मराठी बातम्या  /  धर्म  /  Tilak On Forehead: कपाळावर टिळा का लावतात? हे आहेत फायदे, तुम्हीही रोज लावायला सुरू कराल!

Tilak On Forehead: कपाळावर टिळा का लावतात? हे आहेत फायदे, तुम्हीही रोज लावायला सुरू कराल!

Nov 27, 2024 03:33 PM IST

Tilak on Forehead: हिंदू धर्मातील कोणताही धार्मिक कार्यक्रम, पूजा कपाळावर टिळा किंवा गंध लावल्याशिवाय पूर्ण होत नाही. कपाळाला चंदन (Chandan), गंध, कुंकू (Kumkum) किंवा भस्माचा टिळा लावून सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते अशी मान्यता आहे. यामुळे वाईट ग्रह देखील शांत होतात.

कपाळावर टिळा का लावतात? हे आहेत फायदे, तुम्हीही रोज लावायला सुरू कराल!
कपाळावर टिळा का लावतात? हे आहेत फायदे, तुम्हीही रोज लावायला सुरू कराल!

Tilak on Forehead: हिंदू धर्मात कपाळावर टिळा लावणे हे अतिशय शुभ आणि मंगल समजले जाते. हिंदू धर्मात लोक पूजेनंतर तसेच कोणत्याही धार्मिक आणि सास्कृतिक कार्यक्रमात कपाळावर टिळा जरूर लावतात. ज्योतिषशास्त्रात देखील याचे मोठे लाभ मिळत असल्याचे म्हटलेले आहे. कपाळावर टिळक लावल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते. या बरोबरच जीवनात प्रगतीचा मार्ग देखील खुला होतो, असे म्हटले जाते. यासोबतच कपाळावर टिळक लावल्याने अशुभ ग्रहांची स्थिती सुधारते असेही सांगितले जाते. चला जाणून घेऊ या, रोज कपाळावर टिळा लावल्याने कोणते फायदे मिळतात

कपाळावर टिळा लावल्याने मिळते सकारात्मक ऊर्जा

रोज कपाळावर टिळा लावल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा येते असे म्हणतात. सकाळी पूजेनंतर कपाळावर टिळा लावल्यास तुमचा दिवस उर्जेने भरलेला जाईल. त्याच प्रमाणे टिळा लावल्याने तुमचे लक्ष तुम्ही हाती घेतलेल्या कामावर अधिक वाढेल. एकाग्रता येईल. या बरोबरच कपाळावर टिळा लावल्याने व्यक्तीचे तेज वाढते अशीही मान्यता आहे. 

कपाळावरच्या जागेला अज्ञाचक्र म्हणतात. दोन डोळ्यांच्या वर कपाळावरच्या जागेवर आज्ञाचक्र असते. या आज्ञाचक्रावर टिळा लावला जातो.  ते ऊर्जेचे केंद्र आहे असे मानले गेले आहे. जर तुम्ही तेथे टिळा लावला तर ते आज्ञाचक्र प्रभावित करते. यामुळे मन शांत होते आणि एकाग्रता वाढते, असे म्हटले जाते

टिळा ग्रहांच्या वाईट प्रभावापासून सुटका करतो

ज्योतिषशास्त्रानुसार, कपाळावर टिळा लावण्याचे काही लाभ देखील सांगितले गेल आहेत. कपाळावर टिळा लावल्याने व्यक्तीच्या कुंडलीत सुरू असलेल्या अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होतो असे सांगितले गेले आहे. यामुळे व्यक्तीच्या राशीच्या शासक ग्रहाचे मनोबल वाढते. तुमच्या राशीत शनी आणि राहू आणि केतू यांच्यामुळे तुम्हाला अडचणी येत असतील तर कपाळावर टिळा लावल्याने त्यांचा प्रभाव कमी होतो. 

तुमच्या राशीनुसार लावा कपाळावर टिळा

यासोबतच राशीनुसार कपाळावर टिळा लावण्याचे फायदेही आहेत. असे केल्याने कुंडलीत सुरू असलेल्या ग्रह दोषांपासून व्यक्तीची सुटका होते, असे ज्योतिषशात्रात सांगितलेले आहे.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner