मराठी बातम्या  /  धर्म  /  Chaitra Navratri 2023 : दुर्गेला प्रसन्न करायचं असल्यास अष्टमीला करा हे खास उपाय

Chaitra Navratri 2023 : दुर्गेला प्रसन्न करायचं असल्यास अष्टमीला करा हे खास उपाय

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Mar 28, 2023 10:24 AM IST

Things To Do On Chaitra Navratri Ashtami : आता अष्टमी २९ मार्च रोजी सुरू होणार आहे. नवरात्रीत अष्टमी आणि नवमीच्या दिवसांना खूप महत्व प्राप्त झालं आहे. अष्टमीच्या दिवशी दुर्गेच्या महागौरी या रुपाची पूजा केली जाते.

या उपायांनी करा दुर्गेला प्रसन्न
या उपायांनी करा दुर्गेला प्रसन्न (हिंदुस्तान टाइम्स)

चैत्र नवरात्रीचे सात दिवस संपले आहेत आणि आता अष्टमी २९ मार्च रोजी सुरू होणार आहे. नवरात्रीत अष्टमी आणि नवमीच्या दिवसांना खूप महत्व प्राप्त झालं आहे. अष्टमीच्या दिवशी दुर्गेच्या महागौरी या रुपाची पूजा केली जाते. महाष्टमीच्या दिवशी कडक उपवास करून नवार्ण यंत्राची आणि दुर्गामातेची पूजा करतात. तसेच या दिवशी होम करुन सप्तशतीचा पाठ देखील करतात.

ट्रेंडिंग न्यूज

अष्टमीला देवीला प्रसन्न करायचं असेल तर करा हे उपाय

माता दुर्गेला आवडणारं कमळाचं फुल तिच्या चरणी अर्पण केल्यास माता दुुर्गा प्रसन्न होते. त्यामुळे महाष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेला आठ कमळ अर्पण करावीत. यानं तुमच्या सर्व मनोकामना देवी पूर्ण करेल.

दुर्गा सप्तशतीचा पाठ अवश्य करावा. नवरात्रीच्या आधीच्या दिवसात तुम्हाला हा पाठ करणं जमलं नसेल तर महाष्टमीच्या दिवशी हा पाठ अवश्य करावा. यामुळे तुमच्या घरात सुखसमृद्धी येईल.

आपल्या ऑफिसात, घरी किंवा दुकानात अष्टमीचा हवन करुन घ्यावा. यामुळे तुमच्या घरातल्या सदस्यांवर किंवा ऑफिसमधल्या सहकाऱ्यावर येणारी संकटं दूर होतात.

दुर्गाष्टमीच्या रात्री घराच्या मुख्य दारावर गाईच्या तुपाचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की यामुळे सर्व ग्रह दोष दूर होतात आणि सौभाग्य वाढते.

महाअष्टमीच्या रात्री देवीला मंदिरात सोळा शृंगार अर्पण करणे खूप फायदेशीर मानले जाते. असे केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि घरातील सर्व सदस्यांमध्ये प्रेम आणि आपुलकी वाढते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग