मराठी बातम्या  /  धर्म  /  Ramadan 2024 : रोजा सोडण्यासाठी खजूरच का खाल्ला जातो? धार्मिक आणि वैज्ञानिक कारण जाणून घ्या

Ramadan 2024 : रोजा सोडण्यासाठी खजूरच का खाल्ला जातो? धार्मिक आणि वैज्ञानिक कारण जाणून घ्या

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 15, 2024 05:03 PM IST

Ramadan 2024 Roza : इस्लाम धर्माच्या अनुयायांसाठी रमजान महिना हा अत्यंत पवित्र काळ मानला जातो. रमजानमध्ये उपवास केल्याने अल्लाह लवकर प्रसन्न होतो आणि लोकांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतो.

Ramadan 2024 Roza रोजा सोडण्यासाठी खजूरच का खाल्ला जातो? धार्मिक आणि वैज्ञानिक कारण जाणून घ्या
Ramadan 2024 Roza रोजा सोडण्यासाठी खजूरच का खाल्ला जातो? धार्मिक आणि वैज्ञानिक कारण जाणून घ्या

Importnace of Dates In Ramadan : इस्लाम धर्मात रमजानचा महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. हा संपूर्ण महिना मुस्लिम बांधव सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास करतात. भारतात १२ मार्चपासून रमजानला सुरुवात झाली आहे.

रोजाचे महत्व

रमजानमधील उपवासाचे विशेष महत्त्व मानले जाते. रमजानमध्ये उपवास करणारे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत महिनाभर उपवास करतात. या काळात दररोज रात्री नमाज अदा केली जाते. इफ्तारच्या वेळी विविध प्रकारचे पदार्थ बनवून उपवास सोडला जातो. रमजानचा पवित्र महिना चांगली कृत्ये करण्यासाठी समर्पित आहे.

या काळात इस्लामचे अनुयायी त्यांचा बहुतांश वेळ अल्लाहची उपासना करण्यात घालवतात. मुस्लिम धर्मग्रंथांमध्ये असे मानले जाते की जो माणूस रमजान महिन्यात नियमानुसार उपवास करतो आणि खऱ्या मनाने अल्लाहची प्रार्थना करतो, त्याच्या सर्व प्रार्थना स्वीकारल्या जातात आणि त्याच्या सर्व पापांची क्षमा केली जाते.

रोजा सोडण्यासाठी खजूरच का खाल्ला जातो?

रमजानमध्ये खजूर खाऊन उपवास सोडणे सुन्नत मानले जाते. इस्लामिक मान्यतेनुसार, खजूर हे पैगंबर हजरत मोहम्मद यांचे आवडते फळ होते. तेदेखील खजूर खाऊनच रोजा सोडायचे. त्यामुळे मुस्लिम धर्माचे लोकही उपवास सोडण्यासाठी आधी खजूर खातात आणि त्यानंतर इतर पदार्थांचे सेवन करतात.

आरोग्यासाठीही खजूरचे अनेक फायदे

आरोग्यासाठीही खजूराचे अनेक फायदे आहेत. अशा स्थितीत उपवास करणाऱ्या व्यक्तीने दिवसभर उपवास केल्यानंतर खजूर खाऊन उपवास सोडला तर त्याला त्वरित ऊर्जा मिळते. खजूर शरीरातील हायड्रेशन टिकवून ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे उपवास करण्यापूर्वी आणि नंतर खजूर खाणे चांगले मानले जाते.

खजूर पोषक तत्वांनी समृद्ध 

खजूर फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि जीवनसत्त्वे यासह आवश्यक पोषक तत्वांचे पॉवरहाऊस आहे. हे पोषक घटक दीर्घकाळ उपवास केल्यानंतर उर्जेची पातळी भरून काढण्यासाठी आणि शरीराचे पोषण करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

WhatsApp channel

विभाग