मराठी बातम्या  /  religion  /  Ram Navami 2023 : रामनवमीच्या दिवशी अवश्य खरेदी करा 'या' गोष्टी
भगवान श्री राम
भगवान श्री राम (हिंदुस्तान टाइम्स)

Ram Navami 2023 : रामनवमीच्या दिवशी अवश्य खरेदी करा 'या' गोष्टी

25 March 2023, 8:07 ISTDilip Ramchandra Vaze

Things To Buy On Ram Navami : तुम्हालाही यंदा रामनवमी तुमच्या परिवारासाठी अतिशय संस्मरणीय बनवायची असेल तर रामनवमीला काही गोष्टी घरात आणाव्यात.

रामनवमी आता काही दिवसांवर आली आहे. चैत्र नवरात्रीची सांगता नवमीने होणार आहे आणि त्याच दिवशी प्रभू श्रीरामाचा जन्म असणार आहे. भारताच्या उत्तरेकडील राज्यात मुख्यत्वे चैत्र नवरात्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. याचं कारणच मुळात त्यापाठोपाठ येणाऱ्या श्रीराम नवमीचं असतं. रामनवमी देशभरात उत्साहात साजरी केली जाईल. मात्र तुम्हालाही यंदा रामनवमी तुमच्या परिवारासाठी अतिशय संस्मरणीय बनवायची असेल तर रामनवमीला काही गोष्टी घरात आणाव्यात. या गोष्टी घरात आणल्याने घरात भक्तीचं आणि प्रसनेनतेचं वातावरण राहातं असं सांगितलं जातं. पाहूयात रामनवमीला घरात कोणत्या वस्तू आणाव्यात.  

ट्रेंडिंग न्यूज

राम नवमीला काय कराल खरेदी

 या दिवशी पूजेच्या वस्तू, शुभ वस्तू, पिवळ्या वस्तू किंवा सोने खरेदी करा. 

राम नवमीच्या दिवशी चांदीचा हत्ती खरेदी करून घरात स्थापित करावा. 

राम नवमीला तुम्ही हनुमान किंवा श्रीराम सीतेची मूर्ती देखील खरेदी करू शकता.

या दिवशी तुम्ही घरासाठी सजावटीच्या वस्तूही खरेदी करू शकता. 

राम नवमीच्या दिवशी वाहन, जमीन किंवा इमारत खरेदी करणे देखील शुभ असते.

कसा साजरा करतात रामनवमीचा दिवस

या दिवशी घरोघरी धार्मिक ग्रंथांचं वाचन केलं जातं. संध्याकाळी घरात रामरक्षा स्त्रोत्र म्हटलं जातं. अनेक ठिकाणी भजन-कीर्तनाचे आयोजनही केले जाते. रामाची मूर्ती फुलांनी आणि हारांनी सजविली जाते आणि पाळणामध्ये स्थापित केली जाते. अनेक ठिकाणी पालख्या किंवा मिरवणुका काढल्या जातात. अयोध्येत राजजन्मोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)

 

 

विभाग