मराठी बातम्या  /  religion  /  Religion : कोणता जप करताना कोणती माळ वापराल?, काय सांगतं शास्त्र?
जपमाळ
जपमाळ (हिंदुस्तान टाइम्स)

Religion : कोणता जप करताना कोणती माळ वापराल?, काय सांगतं शास्त्र?

14 March 2023, 12:23 ISTDilip Ramchandra Vaze

Rosary & Mantra : कोणत्या देवतेचं स्मरण करताना किंवा कोणता मंत्र म्हणताना हाती कोणती माळ असावी याचीही माहिती हिंदू धर्मशास्त्रात आढळते.

हिंदू धर्मात पूजेचं महत्व अनन्य साधारण आहे. रोज सकाळी घरी आंघोळ केल्यावर पहिल्यांदा घरातल्या देवांची पूजा त्यानंतर आपल्या आईवडिलांना नमस्कार करुन आपण घराबाहेर पडतो. वेळ असल्यास आपण देवळात जातो. तिथेही वेगवेगळ्या देवतांची आपण पूजा करतो. 

ट्रेंडिंग न्यूज

अनेकदा पूजा करताना काहीजणं जपमाळेचा उपयोग करत असल्याचं आपण पाहिलं असेल. जपमाळ ओढण्याचं शास्त्रीय कारण मनाची एकाग्रता हे असलं तरीही मुखी परमेश्वराचं नाव आणि त्यासोबत जपमाळेचे एकएक मणी ओढणे असं सर्वसाधारण चित्र आपल्याला पाहायला मिळतं. मात्र कोणत्या देवतेचं स्मरण करताना किंवा कोणता मंत्र म्हणताना हाती कोणती माळ असावी याचीही माहिती हिंदू धर्मशास्त्रात आढळते. आज आपण याबद्दलच बोलणार आहोत.

कोणता मंत्र म्हणताना कोणती माळ हाती असावी

तुळशीची माळ

ही माळ विशेषत: भगवान विष्णूच्या मंत्राचा जप करण्यासाठी वापरली जाते. याशिवाय, भगवान राम आणि श्री कृष्णाच्या मंत्रांचा जप करण्यासाठी तुळशीची माळ वापरणे चांगले आहे कारण धार्मिक ग्रंथांनुसार भगवान श्री राम आणि कृष्ण हे दोघेही विष्णूचे अवतार आहेत.

स्फटिकांची माळ

स्फटिकांची माळ माता दुर्गेच्या सर्व रूपांच्या मंत्रांच्या जपासाठी वापरली जाते. याशिवाय धनाची देवी माता लक्ष्मी आणि विद्येची देवी माता सरस्वती यांच्या मंत्रोच्चारासाठीही स्फटिक मणी वापरतात. 

रुद्राक्षाची माळ 

रुद्राक्षाच्या माळेने भगवान शिवाचा जप करणे खूप शुभ आहे कारण रुद्राक्ष हे भगवान शंकराचे रूप आहे. या माळेने महामृत्युंजय आणि लघु मृत्युंजय मंत्रांचा जप करावा. रुद्राक्ष जपमाळेत १०८ मणी असतात. या १०८ मण्यांचं धार्मिक महत्त्व खूप आहे.

कमलगट्टाची माळ

ही माळ माता लक्ष्मी आणि माता दुर्गा यांच्या मंत्रांसाठी वापरली जाते. कमलगट्टा जपमाळेतही १०८ मणी आहेत.

(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)

 

विभाग