Pradosh Vrat 2023 : वैशाख महिन्यातलं प्रदोष व्रत कोणत्या तारखेला साजरं करावं?, २ की ३ मे?
Budh Pradosh Vrat : ही तिथी भगवान शिवाला समर्पित आहे. यंदाचं प्रदोष व्रत बुधवारी येत असल्याने याला बुध प्रदोष व्रत म्हणून ओळखलं जाईल.
प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशीला पाळले जाते. एका महिन्यात दोन प्रदोष व्रत केली जातात, एक शुक्ल पक्षात आणि एक कृष्ण पक्षात. ही तिथी भगवान शिवाला समर्पित आहे. आठवड्यातील त्रयोदशी तिथी ज्या दिवशी येते, प्रदोष व्रत त्या नावाने ओळखले जाते. यंदाचं प्रदोष व्रत बुधवारी येत असल्याने याला बुध प्रदोष व्रत म्हणून ओळखलं जाईल.
ट्रेंडिंग न्यूज
कधी केलं जाईल प्रदोष व्रत?
मे महिन्यालं हे प्रदोष व्रत बुधवार, ३ मे २०२३ रोजी पाळण्यात येणार आहे. त्रयोदशी तिथी २ मे च्या रात्री ११.१८ पासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी ३ मे पर्यंत चालेल. ३ मे रोजी उदय तिथी असल्याने या दिवशीच प्रदोष व्रत करण्यात येणार आहे.
प्रदोष व्रताचे मुहूर्त कोणते आणि महत्त्व काय?
वैशाख शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी २ मे २०२३ रोजी रात्री ११.१८ वाजता सुरू होईल आणि ३ मे २०२३ रोजी रात्री ११.५० वाजता संपेल. अशा स्थितीत बुधवारी म्हणजेच, ३ मे रोजी हे व्रत पाळण्यात येणार आहे. प्रदोष व्रताच्या पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी ०६:५५ ते ०९:०६ असेल. असे म्हटले जाते की बुधवारी प्रदोष व्रत पाळल्याने बुध ग्रहाशी संबंधित दोष दूर होतात.
का करतात प्रदोष व्रत?
संतती प्राप्तीसाठी
शनि प्रदोष व्रताच्या दिवशी पिंपळ आणि बेल पतार्वर पाणी शिंपडावे आणि त्यांना धुवून घ्यावे. या दिवशी बेलाच्या झाडावर तुपाचा दिवा लावून शिव चालिसाचे पठण करा. असे केल्याने शिव प्रत्येक दुःखापासून तुमचे रक्षण करतो, असे मानले जाते. तुमच्या मुलांवर कधीच संकट येत नाही. ज्यांना मुलं नाहीत त्यांना संतती प्राप्ती होते.
शनिदेवाच्या अशुभ प्रभावापासून आराम मिळवण्यासाठी
जर तुम्हाला शनिदेवाच्या अशुभ प्रभावाने त्रास होत असेल, तर शनि त्रयोदशीच्या दिवशी उडीद डाळ, काळ्या रंगाचे जोडे, काळे तीळ, उडीद खिचडी, छत्री आणि घोंगडी इत्यादी दान करा. यामुळे शनिदोष दूर होतो.
आरोग्याच्या फायद्यांसाठी
प्रदोष व्रतामध्ये काळे तीळ दान केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते. ज्यामुळे व्यक्ती गंभीर आजारांपासून मुक्त होते. असे मानले जाते की काळे तीळ दान केल्याने भगवान शिव आणि शनिदेव दोघेही प्रसन्न होतात आणि साधकावर कृपा करतात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या
विभाग