Pradosh Vrat 2025: फाल्गुन महिन्याचे पहिले प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या योग्य तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी
मराठी बातम्या  /  धर्म  /  Pradosh Vrat 2025: फाल्गुन महिन्याचे पहिले प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या योग्य तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

Pradosh Vrat 2025: फाल्गुन महिन्याचे पहिले प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या योग्य तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

Updated Feb 21, 2025 09:00 PM IST

Pradosh Vrat 2025: हिंदू दिनदर्शिकेनुसार फाल्गुन महिन्यातील पहिले प्रदोष व्रत 25 फेब्रुवारी 2025 रोजी केले जाईल. भगवान भोलेनाथांच्या उपासनेसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. यामुळे साधकाला इच्छित फळ मिळते, असे मानले जाते.

फाल्गुन महिन्याचे पहिले प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या योग्य तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी
फाल्गुन महिन्याचे पहिले प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या योग्य तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

Pradosh Vrat February 2025: हिंदू दिनदर्शिकेनुसार फाल्गुन महिना १३ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू झाला आहे. या महिन्यातील पहिले प्रदोष व्रत मंगळवार, २५ फेब्रुवारी २०२५ रोजी केले जाईल. ते मंगळवारी आले असल्याने त्याला भूम प्रदोष व्रत म्हटले जाईल. प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत केले जाते. हा दिवस भगवान भोलेनाथाच्या पूजेसाठी खास मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार प्रदोष व्रत आणि उपवासाच्या दिवशी शिवाची पूजा केल्याने साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात सुख-समृद्धी येते. जाणून घेऊ या, फाल्गुन महिन्याच्या पहिल्या प्रदोषाची नेमकी तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत.

फाल्गुन महिन्यातील पहिलं प्रदोष कधी आहे?

द्रिक पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाची त्रयोदशी तिथी २५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १२ वाजून ४७ मिनिटांनी सुरू होईल आणि २६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजून ०८ मिनिटांनी संपेल. अशा तऱ्हेने प्रदोष काल पूजेचा मुहूर्त लक्षात घेऊन २५ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदोष व्रत केले जाणार आहे.

प्रदोष व्रत फेब्रुवारी २०२५: पूजा मुहूर्त

द्रिक पंचांगानुसार २५ फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी ०६ वाजून १८ मिनिटांपासून ते ०८ वाजून ४९ मिनिटांपर्यंत प्रदोष काल पूजेचा मुहूर्त असेल.

प्रदोष व्रत २०२५: पूजाविधी 

  • प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठा.
  • आंघोळीनंतर स्वच्छ कपडे घाला.
  • शिवलिंगाचा जलाभिषेक करावा.
  • यानंतर शिव आणि गौरीची विधिवत पूजा करावी.
  • शिवमंत्रांचा जप करा.
  • संध्याकाळी प्रदोष काळपूजेची तयारी करा.
  • शक्य असल्यास पुन्हा आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत.
  • शिवमंदिरात जा किंवा घरी शिवलिंगाला जल अर्पण करा.
  • शिवलिंगावर दूध, दही, तूप, गंगाजल आणि मध अर्पण करा.
  • आता भोलेनाथांना बेलपत्र, मदार फूल, भांग आणि धोतरा अर्पण करा.
  • ॐ नम: शिवाय या मंत्राचा जप करा. शिव चालीसा पठण करा.
  • शिव आणि गौरीसह सर्व देवी-देवतांची आरती करा.
  • शेवटी उपासनेत झालेल्या चुकीबद्दल क्षमा मागावी आणि पूजा समाप्त करावी.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Sunil Madhukar Tambe

eMail

Whats_app_banner