सध्या माघ महिना सुरू आहे, हिंदू कॅलेंडरनुसार दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी रथ सप्तमी साजरी केली जाते. हा उत्सव भगवान भास्कराला समर्पित आहे. रथ सप्तमी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला साजरा केला जातो.
हा दिवस सूर्य देवाला समर्पित असून या दिवशी सूर्य देवाची पूजा केली जाते. या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने इच्छित फळ प्राप्त होते.
यासोबतच सूर्यनारायणाच्या कृपेने जीवनात समृद्धी, संपत्ती, कीर्ती, अपार यश इत्यादींचा आशीर्वादही प्राप्त होतो. शास्त्रात सूर्य देवाला जगाचा आत्मा म्हटले आहे आणि ज्योतिष शास्त्रात तो ग्रहांचा राजा आहे. त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने शाही सुखाची प्राप्ती होते.
तर मग यावेळी रथ सप्तमी कधी साजरी होणार आहे आणि रथ सप्तमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त कोणता असेल? ते जाणून घ्या.
रथ सप्तमी ही सूर्य जयंती म्हणून साजरी केली जाते. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी सूर्यदेवाचा जन्म झाला होता आणि या दिवसापासून त्यांनी संपूर्ण सृष्टीला प्रकाश दिला. म्हणून या दिवशी सूर्यदेवाची उपासना केली जाते. असे केल्याने मनुष्याला शाश्वत पुण्य प्राप्त होते.
या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करा, असे केल्याने भगवान सूर्यदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात.
या दिवशी स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करणे आणि त्यांची स्तुती करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सूर्य शक्ती आणि आत्मविश्वासाचा कारक आहे. अशा स्थितीत या दिवशी सर्यदेवाची पूजा केल्याने विशेष लाभ होतो.
काही लोक रथ सप्तमीच्या दिवशीही उपवास करतात. उपवास करणाऱ्या व्यक्तीने सूर्योदयापूर्वी आंघोळ करावी आणि फळ आहारात फळं, दूध इत्यादींचे सेवन करावे. व्रतादरम्यान सूर्याची पूजा करावी आणि मंत्रांचा उच्चार करावा. असे केल्याने जीवनातील सर्व भौतिक सुखांची प्राप्ती होते.
रथ सप्तमी - १६ फेब्रुवारी २०२४, शुक्रवार
शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी प्रारंभ- १५ फेब्रुवारी २०२४, गुरुवार, सकाळी १०.१२ पासून.
शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी समाप्त - १६ फेब्रुवारी २०२४, शुक्रवार, सकाळी ८:५४ वाजता समाप्त होईल.
रथ सप्तमी स्नान मुहूर्त - १६ फेब्रुवारी २०२४, शुक्रवार, सकाळी ५:१७ ते ६:५९ पर्यंत.
१) ओम सूर्याय नम:
२) ओम ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्रकिरणराय मनोवंचित फलं देही देहि स्वाहा
३) ॐ आही सुर्य सहस्त्रांषों तेजो राशे जगतपते, अनुकंपयेमा भक्त्या, ग्रहानर्घ्य दिवाकार:
४) ओम घृणी सूर्याय नमः
५) ओम आदित्यय नम:
६) ओम भास्कराय नम:
७) ओम मित्राय नम:
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)