Mahashivratri 2024 : हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्व आहे. महाशिवरात्री ही शिवभक्तांसाठी खास मानली जाते. या शुभ दिवशी भगवान शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे, जे लोक या दिवशी उपवास करतात आणि भगवान शंकरासोबत पार्वतीची पूजा करतात, त्यांचे वैवाहिक जीवन सुखी राहते.
तसेच घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. यंदा महाशिवरात्रीला एक नव्हे तर ४ शुभ संयोग घडणार आहेत. त्यामुळे यंदाच्या महाशिवरात्रीचे महत्त्व आणखी वाढले आहे.
पंचांगाप्रमाणे माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीची सुरुवात ८ मार्च रोजी रात्री ९ वाजून ५७ मिनिटावर होईल. दुसऱ्या दिवशी ९ मार्च रोजी संध्याकाळी ६:१७ वाजता संपेल.
प्रदोष काळात भगवान शंकराची पूजा केली जाते, म्हणून उदय तिथी पाळण्याची गरज नाही. अशात यंदा महाशिवरात्रीचे व्रत ८ मार्च २०२४ रोजी पाळले जाणार आहे.
महाशिवरात्री पूजा मुहूर्त - सकाळी १२:०७ ते १२:५६ वाजेपर्यंत
सर्वार्थ सिद्धी योग - सकाळी ०६:३८ ते १०:४१ वाजेपर्यंत
शिवयोग - ९ मार्च रोजी सूर्योदयापासून रात्री १२:४६ पर्यंत
सिद्ध योग - ९ मार्च रात्री १२:४६ ते सकाळी ८:३२ पर्यंत
श्रावण नक्षत्र- सकाळी १०:४१ पर्यंत.
सर्वार्थ सिद्धी योगात केलेली सर्व कामे सफल होतात. विशेषत: जेव्हा महाशिवरात्री या शुभ मुहूर्तावर येते.
शिवयोगामध्ये ध्यान करणे आणि मंत्रांचा जप करणे चांगले मानले जाते. या शुभ मुहूर्तावर भोलेनाथाची पूजा केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते. याशिवाय घरामध्ये शुभ कार्य होण्याची शक्यता आहे.
सिद्ध योगाचा संबंध अडथळे दूर करणाऱ्या गणेशाशी आहे. असे मानले जाते की यामुळे तुमच्या सर्व कामात यश मिळते.
श्रावण नक्षत्राचा स्वामी शनिदेव आहे आणि तो आपल्या शुभतेसाठी ओळखला जातो. श्रवण नक्षत्रात कोणतेही काम केले तरी त्याचे फळ शुभच असते. या नक्षत्रात जन्मलेले लोक श्रीमंत, प्रसिद्ध आणि आनंदी असतात.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या