मराठी बातम्या  /  धर्म  /  Hindu New Year 2024 : हिंदू नववर्ष २०२४ कधी आहे? तारीख आणि महत्त्व जाणून घ्या

Hindu New Year 2024 : हिंदू नववर्ष २०२४ कधी आहे? तारीख आणि महत्त्व जाणून घ्या

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 22, 2024 06:41 PM IST

hindu new year 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार, यावेळी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा ९ एप्रिल २०२४ रोजी आहे. म्हणजेच, यंदा हिंदू नववर्ष मंगळवार, ९ एप्रिल २०२४ पासून सुरू होईल.

Hindu New Year 2024 : हिंदू नववर्ष २०२४ कधी आहे? तारीख आणि महत्त्व जाणून घ्या
Hindu New Year 2024 : हिंदू नववर्ष २०२४ कधी आहे? तारीख आणि महत्त्व जाणून घ्या

सनातन धर्माच्या परंपरेनुसार १ जानेवारी हे हिंदूंचे नवीन वर्ष मानले जात नाही. हिंदू कॅलेंडरनुसार नवीन वर्ष चैत्र महिन्यात येते. २०२४ वर्ष आधीच सुरू झाले आहे. पण हिंदू परंपरेत या नवीन वर्षाला महत्त्व दिले जात नाही. हिंदू धर्म आणि वैदिक कॅलेंडरनुसार हिंदू नववर्ष कधी साजरे केले जाते? हे आपण येथे जाणून घेणार आहोत.

ब्रह्म पुराणानुसार विश्वाची निर्मिती

चैत्र महिना जगत ब्रह्म संसार प्रथमेहणी,

शुक्ल पक्ष समग्रेतु तदा सूर्योदय सती ।

हिंदू धर्माच्या ब्राह्मण पुराणानुसार, विष्णूजींनी ब्रह्माजींना विश्वाच्या निर्मितीचे कार्य सोपवले होते आणि जेव्हा ब्रह्माजींनी विश्वाची निर्मिती केली, तो दिवस चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी होती. त्यामुळे या दिवशी धार्मिक कार्य करणे अत्यंत शुभ मानले जाते.

हिंदू दिनदर्शिकेनुसार, नवीन वर्षाला नूतन संवत्सर म्हणून संबोधण्याची परंपरा आहे आणि सध्या २०८० विक्रम संवत्सर सुरू आहे. जेव्हा चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी येते, तेव्हा हिंदू दिनदर्शिकेनुसार, नवीन वर्ष २०८१ वैध असेल. 

पण पाश्चात्य मान्यतेनुसार, नवीन वर्ष दरवर्षी १ जानेवारीपासून साजरे केले जाते आणि ते ज्युलियन कॅलेंडरवर आधारित आहे. या दोघांमध्ये वर्षांचाही फरक आहे, ज्युलियन कॅलेंडरमध्ये चालू वर्ष २०२४ आहे, तर हिंदू कॅलेंडरनुसार, नवीन संवत्सर (हिंदू नववर्ष) यावेळी २०८१ असेल. दोघांमध्ये ५७ वर्षांचा फरक आहे. हिंदू नववर्ष हे इंग्रजी नववर्षापेक्षा ५७ वर्षे पुढे आहे.

या वर्षी हिंदू नववर्ष कधी आहे?

हिंदू कॅलेंडरनुसार, यावेळी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा ९ एप्रिल २०२४ रोजी आहे.  म्हणजेच, यंदा हिंदू नववर्ष मंगळवार, ९ एप्रिल २०२४ पासून सुरू होईल असे मानले जाईल.

सनातन संस्कृतीत हिंदू नववर्ष कसे साजरे केले जाते?

हिंदू धर्माच्या परंपरेनुसार नववर्ष म्हणजेच नवसंवत्सराची पूजा केली जाते. नववर्षाच्या दिवशी प्रथम पूज्य भगवान श्री गणेशाची पूजा करून, विश्वातील सर्व प्रमुख देवी-देवतांची पूजा करून, वेद आणि पंचांग इत्यादींचे पूजन करून नवीन वर्षाचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले जाते.

हिंदू कॅलेंडरची म्हणजेच पंचागाची सुरुवात कधी?

उज्जैनचा राजा विक्रमादित्य याने सुमारे २००० वर्षांपूर्वी विक्रम संवत सुरू केल्याचे मानले जाते. हिंदू संस्कृतीनुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला महत्त्व देऊन विक्रमादित्याने संपूर्ण भारतातील लोकांना हे पंचांग उपलब्ध करून दिले होते.

 

 

 

 

 

 

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel