Dhantrayodashi : धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू का लपवतात? जाणून घ्या कारण
मराठी बातम्या  /  धर्म  /  Dhantrayodashi : धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू का लपवतात? जाणून घ्या कारण

Dhantrayodashi : धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू का लपवतात? जाणून घ्या कारण

Updated Nov 09, 2023 07:42 PM IST

When is Dhanteras 2023: यावर्षी धनत्रयोदशी येत्या शुक्रवारी (१० नोव्हेंबर) साजरी केली जाणार आहे.

Dhanteras 2023
Dhanteras 2023

Dhanteras 2023 Shubh Muhurat: दिवाळीची सुरुवात धनतेरस म्हणजेच धनत्रयोदशीपासून सुरु होते. यावर्षी धनत्रयोदशी येत्या शुक्रवारी (१० नोव्हेंबर) साजरी केली जाणार आहे. धनत्रयोदशीला लक्ष्मी, कुबेर आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते. या दिवशी सोने, चांदी अशा अनेक वस्तूंची खरेदी करतात. धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू देखील खरेदी करण्याची परंपरा आहे. सर्वात प्रथम धनत्रयोदशी हा सण का साजरा केला जातो? तसेच या दिवशी झाडू का लपवला जातो? यामागचे कारण जाणून घेऊयात

या दिवशी भगवान धन्वंतरीचा जन्म झाला होता असे म्हटले जाते, म्हणून याला धनत्रयोदशी म्हणतात. त्यांना आयुर्वेदाचे जनक देखील म्हटले जाते. पौराणिक कथेनुसार असे म्हटले जाते की, समुद्रमंथनाच्या वेळी भगवान धन्वंतरी प्रकट झाले होते, त्यावेळी त्यांच्या एका हातात अमृतलाश, दुसऱ्या हातात आयुर्वेदिक ग्रंथ, तिसऱ्या हातात औषधी भांडे आणि चौथ्या हातात औषधी वनस्पती होत्या. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते.

धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करण्याची परंपरा आहे, त्यामागचे कारण म्हणजे झाडूला देवी लक्ष्मी मातेचे प्रतीक मानले जाते. चुकून कोणाचा पाय झाडूला लागला तर त्याला स्पर्श करुन नमस्कार केला जातो. झाडू तुमचे घर स्वच्छ ठेवते आणि देवी लक्ष्मी स्वच्छ घरातच वास करते. धनत्रयोदशीला झाडू खरेदी केल्याने वर्षभर घरात आशीर्वाद राहतात, असेही म्हटले जाते.

अनेक ठिकाणी लोक घरात झाडू लपवून ठेवतात. ज्याप्रमाणे आपण घरातील लक्ष्मी म्हणजेच आपले दागिने आणि पैसा इतरांच्या नजरेपासून दूर ठेवतो, त्याचप्रमाणे झाडू देखील घरामध्ये सर्वांच्या नजरेपासून दूर ठेवावा, असे म्हटले जाते. एवढेच नाहीतर धनत्रयोदशीला झाडूची पूजा केली जाते. घरातील कचरा झाडूऐवजी हाताने स्वच्छ करा, झाडू वापरू नका. पलंगाखाली झाडू ठेवणे टाळा. घरात तुटलेला झाडू ठेवू नका. झाडू जुना झाला तर बाहेर कुठेतरी ठेवा, पण खराब झाडू घरात ठेवू नका.

सोने- चांदी खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त

हिंदू धर्मात सर्व शुभ कार्य मुहूर्तानुसार केले जाते, ज्यामुळे कोणतेही कामे अडथळाशिवाय पूर्ण व्हावीत. या वर्षी धनत्रयोदशीला खरेदीसाठी शुभ मुहूर्त १० नोव्हेंबर रोजी दुपारी १२:३५ ते ११ नोव्हेंबर दुपारी १:५७ पर्यंत असेल. या शुभ मुहूर्तावर सोने- चांदीसह अनेक गोष्टी खरेदी केल्या जाऊ शकतात.

Whats_app_banner