मराठी बातम्या  /  धर्म  /  Dhanteras 2023: धनत्रयोदशीच्या दिवशी कधी खरेदी कराल सोने-चांदी? जाणून घ्या शुभ मुहूर्त

Dhanteras 2023: धनत्रयोदशीच्या दिवशी कधी खरेदी कराल सोने-चांदी? जाणून घ्या शुभ मुहूर्त

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Nov 09, 2023 07:42 PM IST

Best Time to Buy Gold on Dhanteras 2023 : यावर्षी धनत्रयोदशी येत्या शुक्रवारी म्हणजेच १० नोव्हेंबर २०२३ साजरी केली जाणार आहे.

Gold
Gold

When Is Dhanteras 2023: हिंदू धर्मात धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करणे शुभ मानले जाते. या शुभ दिवशी सोने-चांदीची खरेदी केल्याने सौभाग्य आणि समृद्धी मिळते असे मानले जाते.धनत्रयोदशीपासून दिवाळीला सुरुवात होते. धनत्रयोदशीला धनतेरस असेही म्हटले जाते. 'धन' म्हणजे पाणी आणि 'तेरस' म्हणजे कृष्ण पक्षातील तेरावा दिवस. धनत्रयोदशीच्या सोने- चांदी खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त कोणाता? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ट्रेंडिंग न्यूज

यावर्षी धनत्रयोदशीचा सण शुक्रवार १० नोव्हेंबर २०२३ रोजी आहे. या दिवशी १२ वाजून ३५ मिनिटांनी शुभ मुहूर्ताला सुरुवात होणार आहे. तर, ११ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ०१.५७ मिनिटांनी समाप्त होईल.

पूजेसाठी शुभ मुहूर्त:

धनत्रयोदशीच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी ०५:४५ ते सकाळी ०७:४२ मि. पर्यंत असेल. पूजेचा कालावधी एक तास ५६ मिनिटे असेल.

 

धनत्रयोदशीला सोने- चांदी खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त

चर- सामान्य: सकाळी ०६.३९ मि. ते सकाळी ०८.०० मि. वाजेपर्यंत

लाभ- उन्नती: सकाळी ०८.०० मि. ते सकाळी ०९.२१ मि. वाजेपर्यंत

अमृत- सर्वोत्तम: सकाळी ०९.२१ मि. ते सकाळी १०.४३ मि. वाजेपर्यंत

शुभ- उत्तम: दुपारी १२. ०४ मि. ते ०१.२५ मि. वाजेपर्यंत

लाभ- उन्नति: रात्री ०८. ४७ मि. ते रात्री १०.२६ मि. वाजेपर्यंत

धनत्रयोदशीला सोने- चांदी खरेदी करणे शुभ का मानले जाते?

धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान कुबेर आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. धनत्रयोदशी म्हणजे संपत्ती आणि समृद्धी म्हणून सोने, चांदी आणि भांडी यांसारख्या इतर उपयुक्त वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. बरेच लोक या दिवशी सोन्यात पैसे गुंतवतात आणि बरेच लोक दागिने म्हणून सोने आणि चांदी खरेदी करतात. कारण या वस्तू घरी आणणे सर्वात शुभ मानले जाते. सोने-चांदी खरेदी करणे हे सौभाग्याचे प्रतीक आहे. सर्वप्रथम ते धन आणि समृद्धीसाठी ते खरेदी केल्यानंतर भगवान कुबेर आणि देवी लक्ष्मीला अर्पण करा आणि त्याची पूजा करा. त्यानंतर आपल्या लॉकरमध्ये ठेवा.

WhatsApp channel