मराठी बातम्या  /  धर्म  /  किन्नरांना काय दान करावे आणि काय करू नये? त्यांच्या आशिर्वादासोबतच शापातही मोठी शक्ती

किन्नरांना काय दान करावे आणि काय करू नये? त्यांच्या आशिर्वादासोबतच शापातही मोठी शक्ती

Feb 10, 2024 05:40 PM IST

हिंदू धर्मात किन्नरांना दान देणे खूप शुभ म्हणून पाहिले जाते. सनातन संस्कृतीत किन्नरांच्या आशीर्वादात शक्ती असते असे मानले जाते.

what should be donated to kinnar
what should be donated to kinnar

हिंदू धर्मामध्ये किन्नरांना दान देण्याचे विशेष महत्त्व आहे. प्रत्येक सण-उत्सवात, घरामधील मंगलकार्याप्रसंगी किन्नरांना दान अवश्य केले जाते. बहुतांश किन्नराचे आयुष्य दानातून आलेल्या पैशातूनच चालते.

हिंदू धर्मात किन्नरांना दान देणे खूप शुभ म्हणून पाहिले जाते. सनातन संस्कृतीत किन्नरांच्या आशीर्वादात शक्ती असते असे मानले जाते. याशिवाय, त्यांच्या शापांमध्ये देखील मोठी शक्ती असल्याची मान्यता आहे. म्हणूनच किन्नरांना कधीही नाराज करू नये, असे म्हटले जाते.

ट्रेंडिंग न्यूज

तुम्ही अनेकदा किन्नरांना लग्न वगैरे प्रसंगी दान मागताना पाहिलं असेल. धार्मिक मान्यतांनुसार, किन्नरांनी दिलेल्या आशीर्वादाने व्यक्तीला सुख-समृद्धी मिळते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला किन्नरांचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही त्यांना काही गोष्टी दान करू शकता. चला तर मग जाणून घेऊया किन्नरांना कोणत्या गोष्टी दान केल्या पाहिजे.

किन्नरांना हिरवे कपडे दान करा

ज्योतिष शास्त्रानुसार, किन्नर हा बुध ग्रहाशी संबंधित मानला जातो. अशा स्थितीत कुंडलीत बुधाची स्थिती मजबूत करण्यासाठी तुम्ही किन्नरांना हिरवे कपडे दान करू शकता. यामुळे तुम्हाला सुख-समृद्धीचे आशीर्वाद मिळतात.

किन्नरांना या वस्तू दानकरणे शुभ मानले जाते

किन्नरांना तांदूळ दान करणे देखील शुभ मानले जाते. असे केल्याने साधकाला देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळू शकतो. त्यामुळे पैशाच्या समस्यांना तोंड द्यावे लागत नाही. याशिवाय किन्नरांना ढोल दान केल्याने तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात यश मिळवू शकता.

तुम्ही किन्नरांना सुपारीसोबत नाणी दान केल्यास, तुम्हाला तुमच्या आर्थिक परिस्थितीत फायदा दिसू शकतो. त्याचबरोबर तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही किन्नरांना पैसे, कपडे, भांडी इत्यादी दानही करू शकता. असे केल्याने तुम्हाला त्यांचा आशीर्वादही मिळतो आणि तुमची सर्व कामे होऊ लागतात.

किन्नरांना या वस्तू दान म्हणून करू नये

तर किन्नरांना प्लॅस्टिकच्या वस्तू, जुने कपडे, तेल, झाडू इत्यादी वस्तू दान म्हणून देऊ नये, या गोष्टी दान देणे अशुभ मानले जाते. यासोबतच, जर किन्नरांनी तुम्हाला १, २, ५ किंवा १० रुपयांचे नाणे आनंदाने परत केले तर ते तुमच्यासाठी शुभाचे प्रतीक असू शकते.

 

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel