ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक कार्य करण्याचा एक योग्य वेळ आणि काळ असतो. कोणतीही गोष्ट कोणत्याही चुकीच्या वेळेला केल्यास त्याचे दुष्परिणाम आपल्याला सहन करावे लागतात. असे करण्याने आपल्या आयुष्यात विविध अडचणींचा सामना करावा लागतो. शिवाय आर्थिक नुकसान होतात. आणि घरामध्ये दारिद्रय यायला सुरुवात होते. या सर्व गोष्टींपासून बचावासाठी ज्योतिषशास्त्राचे आणि वास्तूशास्त्राचे नियम पाळणे फायदेशीर ठरते. ज्योतिष अभ्यासात प्रत्येक अडचणींबाबत असणारे ज्योतिषीय कारण नमूद करण्यात आले आहेत. शिवाय त्या गोष्टींवर उपायसुद्धा सुचविण्यात आले आहेत.
दिवसामध्ये सकाळ आणि सायंकाळ या दोन्ही वेळा विशेष असतात. यावेळेत अनेक लोक पूजापाठ आणि देवी-देवतांची आराधना करत असतात. त्याला अनुसरुनच वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहे की, असे काही कार्य आहेत जे सायंकाळच्या वेळी करणे अतिशय अशुभ असते. त्या गोष्टी केल्याने देवी लक्ष्मी तुमच्यावर रुसते. आणि घरात दारिद्रय यायला सुरुवात होते. अशी कोणती कामे आहेत जी सायकांळी अजिबात करू नयेत याबाबत जाणून घेऊया.
आपल्या घरामध्ये कधीच धनधान्याची कमतरता भासू नये, यासाठी देवी लक्ष्मीला सदैव प्रसन्न ठेवावे लागते. कारण लक्ष्मीच्या कृपेनेच आपल्या घरात भरभराट होते. परंतु आपण कधी कधी नकळत अशी एखादी चूक करतो ज्यामुळे देवी लक्ष्मी रुसून घरातून निघून जाते. अशावेळी घरात फक्त आर्थिक अडचणच येत नाही तर मोठं दारिद्रय यायला सुरुवात होते. सायंकाळच्या वेळी काही गोष्टी करणे आवर्जून टाळा. असे केल्याने लक्ष्मी कधीच तुमच्यावर रुसत नाही. नेहमीच तुमच्यावर लक्ष्मीची शुभ कृपादृष्टी राहायला मदत होते.
ज्योतिषशास्त्रानुसार, सायंकाळच्या वेळी काही गोष्टी करताना काळजी घेणे आवश्यक आहे. घरामध्ये सुख समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी या उपाययोजना करणे गरजेचे आहे. शास्त्रानुसार, सायंकाळी अजिबात झोपू नये किंवा काहीही खाऊ नये. सांयकाळी झोपल्यास लक्ष्मी तुमच्यावर रुसून घरातून निघून जाते. त्यामुळे तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. याशिवाय आरोग्यविषयक समस्यासुद्धा तुम्हाला उद्भवतात.
वैदिक शास्त्रात असे मानले जाते की, तुळशीच्या पानात लक्ष्मीचा वास असतो. सायंकाळच्या वेळी, देवी लक्ष्मी आपले पूर्व देव भगवान विष्णूची पूजा करत असतात. त्यामुळे सांयकाळी तुळशीची पाने तोडल्यास लक्ष्मीचा अशुभ प्रभाव तुम्हाला सहन करावा लागू शकतो. शिवाय सांयकाळच्या वेळी स्वयपांक घरातील मीठ, तिखट, तेल, डाळी, साखर यांसारख्या वस्तू उधार देऊ नका असे केल्यास तुमच्या घरातील लक्ष्मीही त्यासोबत निघून जाते. तसेच सुईसुद्धा सांयकाळी कोणाला देऊ नये अथवा सकारत्मक ऊर्जा घराबाहेर जाऊन नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. देवी लक्ष्मी सांयकाळी घरात प्रवेश करते त्यामुळे या वेळेस चुकूनही घराच्या उंबरठ्यावर बसू नका. असे केल्यास लक्ष्मीला प्रवेश करण्यास अडथळा निर्माण होतो. आणि ती निघून जाते.
संबंधित बातम्या