Papmochani Ekadashi : पापमोचनी एकादशीची कथा काय आहे?, कसा करावा संकल्प?
Story Of Papmochani Ekadashi 2023 : भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठीराला सांगितलेलं हे पापमोचनी व्रत म्हणजे नेमकं काय आहे, त्याची कथा काय आहे.
सर्व पापांमधून मुक्ती देणारं व्रत म्हणून पापमोचनी एकदशीच्या व्रताकडे पाहिलं जातं. शनिवारी म्हणजेच १८ मार्च २०२३ रोजी पापमोचनी एकदशी आहे. पापमोचनी एकादशीच् व्रत कसं करावं याबाबत आम्ही आधीच माहिती दिली आहे मात्र भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठीराला सांगितलेलं हे पापमोचनी व्रत म्हणजे नेमकं काय आहे, त्याची कथा काय आहे, हे आज आपण पाहाणार आहोत.
ट्रेंडिंग न्यूज
काय आहे पापमोचनी एकादशीची कथा
एकदा च्यवन ऋषींचे पुत्र मेधावी ऋषी घोर तपश्चर्येत मग्न होते. त्यांच्या या घोर तपश्चर्येमुळे देवतांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांना मेधावी ऋषींची तपश्चर्या भंग करायचं ठरवलं. मेधावी ऋषींची तपश्चर्या भंग करण्यासाठी देवांनी स्वर्गातील अप्सरा मंजुघोषाला भूतलावर पाठवलं. मंजुघोषाने नृत्य, गायन आणि तिच्या सौंदर्याने मेधावी ऋषींची तपश्चर्या भंग केली. मंजुघोषाच्या सौदर्यावर मोहित होऊन ऋषी मेधावींची तपश्चर्या भंग झाली आणि त्यानंतर मेधावी ऋषी मंजुघोषाबरोबर राहू लागले.
कालांतराने मंजुघोषाने आपणास स्वर्गलोकी परत जायचं आहे अशी विनंती ऋषी मेधावी यांना केली. मंजुघोषाने केलेल्या विनंतीचा ऋषी मेधावी यांना राग आला, आपली तपश्चर्याही मंजुघोषाने भंग केली याचीही त्यांना जाणीव झाली. रागाच्या भरात त्यानी मंजुघोषाला पिशाच्च होण्याचा श्राप दिला. मंजुघोषाने ऋषी मेधावींची क्षमा मागितली आणि श्रापातून मुक्त होण्यासाठी उपाय विचारला. तेव्हा मेधावी ऋषींनी त्यांना पापमोचनी एकादशी व्रत ठेवण्याचा सल्ला दिला.
मात्र मेधावी ऋषी आपल्या वडीलांकडे म्हणजेच च्यवन ऋषींकडे परत आले तेव्हा त्यांना ऋषी मेधावी यांना केलेल्या कृत्याचा राग आला आणि त्यांनी ऋषी मेधावी यांनाही पापमोचनी एकादशीचं व्रत ठेवण्यास सांगितलं. जेणेकरुन ते श्राप देण्याच्या पापापासून मुक्त होऊ शकतील. पापमोचनी एकादशीचं व्रत ठेवल्यानंतर अप्सरा मंजुघोषा सुद्धा शापमुक्त होऊन आपल्या मूळ स्वरुपात आली. त्याच वेळी, मेधावी ऋषीसुद्धा पापातून मुक्त झाले.
पापमोचनी एकादशीचं व्रत कसं करावं
पापमोचनी एकादशीच्या दिवशी सूर्योदयावेळी उठा आणि स्नान केल्यावर व्रताचा संकल्प करा.
यानंतर, श्रीगणेशाचे ध्यान करा आणि पूजा यशस्वी होण्यासाठी प्रार्थना करा.
भगवान विष्णूची मूर्ती स्थापित करा आणि धूप, दीप, चंदन, फुले, फळे, कपडे, नैवेद्य आणि दक्षिणा ठेवा.
पापामोचनी व्रताची कथा वाचा आणि नंतर आरती करा.
दिवसभर व्रत ठेवा. रात्री जागरण भजन कीर्तन करा.
दुसर्या दिवशी द्वादशीला गरजूंना खाऊ घाला आणि यथाशक्ती दान द्या.
यानंतर व्रत सोडण्याचा संकल्प करा.