मराठी बातम्या  /  religion  /  Chaitra Navratri 2023 : देवी काळरात्रीच्या पूजेचा शुभ मुहूर्त कोणता?, कशी कराल पूजा?
देवी कालरात्री
देवी कालरात्री (हिंदुस्तान टाइम्स)

Chaitra Navratri 2023 : देवी काळरात्रीच्या पूजेचा शुभ मुहूर्त कोणता?, कशी कराल पूजा?

28 March 2023, 8:25 ISTDilip Ramchandra Vaze

Story Of Devi Kalratri : वीरतेचं प्रतीक मानल्या गेलेल्या देवी काळरात्रीचं दर्शनही प्रसन्न मुद्रेचं नाही तर वीरतेच्या मुद्रेत होतं.

आज नवरात्रीचा सातवा दिवस आहे. आजचा दिवस देवी काळरात्रीला समर्पित आहे. वीरतेचं प्रतीक मानल्या गेलेल्या देवी काळरात्रीचं दर्शनही प्रसन्न मुद्रेचं नाही तर वीरतेच्या मुद्रेत होतं. मात्र दुर्गेच्या या रुपाची पूजा केल्यास दुष्ट प्रवृत्तींचा नाश होतो असं मानलं गेलं आहे. या नंतर अष्टमी आणि नवमी हे दोन दिवस अत्यंत महत्वाचे दिवस म्हणून पाहिले जातील.

ट्रेंडिंग न्यूज

काय आहे देवी काळरात्रीची कथा

पौराणिक कथांनुसार देवी कालरात्री हे दुर्गा देवीच्या ९ रूपांपैकी एक आहे. देवी कालरात्रीचा रंग कृष्ण आहे आणि या रंगामुळेच देवीच्या या रुपाचे नाव कालरात्री असे आहे. चार भुजा असलेल्या देवी कालरात्रीने तिच्या दोन्ही डाव्या हातात अनुक्रमे कट्यार आणि लोखंडाचा काटा धरला आहे. असुरांचा राजा रक्तबीज याचा संहार करण्यासाठी दुर्गा देवीने तिच्या तेजाने देवी कालरात्रीची निर्मिती केली होती असे मानले जाते. गळ्यात विजेच्या माळा आणि केस विखुरले आहेत. पौराणिक कथेनुसार देवीच्या या रूपाची पूजा केल्याने दुष्टांचा नाश होतो.

देवी कालरात्रीच्या पूजेचे मुहूर्त

चैत्र शुक्ल सप्तमी तारीख - २७ मार्च, संध्याकाळी ०५.२५ ते २८ मार्च सकाळी ०७.०१

द्विपुष्कर योग - २८ मार्च, सकाळी ०६.१५ ते संध्याकाळी ०५.३० पर्यंत

सौभाग्य योग - २७ मार्च, रात्री ११.२० ते २८ मार्च, रात्री ११.३५ वा.

निशिता काल मुहूर्त - २८ मार्च, मध्यरात्री १२.०१ ते १२.४७

कालरात्री स्तुती मंत्र

या देवी सर्वभू‍तेषु माँ कालरात्रि रूपेण संस्थिता।

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

आई कालरात्रीला प्रिय गोष्टी

देवी काळरात्रीला लाल रंग प्रिय आहे, म्हणून तिच्या पूजेमध्ये लाल गुलाब किंवा लाल हिबिस्कसचे फूल अर्पण करावे. कालरात्री देवीला रातराणीची फुले अर्पण करणेही शुभ असते. दुर्गादेवीला प्रसन्न करण्यासाठी साधकाने पूजेत गूळ आणि खोबरं अर्पण करावं. यामुळे कालरात्री देवी प्रसन्न होते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

विभाग