मराठी बातम्या  /  धर्म  /  Amalaki Ekadashi 2023 : समस्यांनी त्रस्त असाल तर आमलकी एकादशीच्या दिवशी करा 'हे' उपाय

Amalaki Ekadashi 2023 : समस्यांनी त्रस्त असाल तर आमलकी एकादशीच्या दिवशी करा 'हे' उपाय

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Mar 01, 2023 01:36 PM IST

Things To Do On Amalaki Ekadashi : या दिवशी आवळ्याच्या झाडाचे आयुर्वेदिक गुणधर्म लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी ही एकादशी आवळ्याच्या गुणधर्मांना समर्पित म्हणून आमलाकी किंवा आमलकी एकदशी म्हणून साजरी केली जाते.

आमलकी एकादशी
आमलकी एकादशी (हिंदुस्तान टाइम्स)

आमलकी एकादशी येत्या ३ मार्च २०२३ रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी आवळ्याच्या झाडाचे आयुर्वेदिक गुणधर्म लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी ही एकादशी आवळ्याच्या गुणधर्मांना समर्पित म्हणून आमलाकी किंवा आमलकी एकदशी म्हणून साजरी केली जाते. 

आवळ्याचं महत्व काय?

साधारपणे होळीपासून शरद ऋतू संपून, वसंत ऋतूचा आरंभ होतो. वसंत ऋतूत तापट उन्हाळा अनुभवायला मिळतो. अशात गोष्टी फार उष्ण होऊ लागतात. त्यावर उपाय म्हणूनही आवळ्याकडे पाहिलं जातं.आवळ्याचे औषधी गुणधर्म आणि उपयोग अनन्य साधारण आहेत. मधुमेह, हृदयाचे आजार, पचनक्रिया, वजन कमी करणे, हाडे मजबूत करणे, डोळ्यांसाठी गुणकारी, संसर्गापासून संरक्षण करणे, असे आवळ्याचे उपाय आहेत.

आमलकी एकादशीचा मुहूर्त २०२३

आमलकी एकादशी तिथीची सुरुवात: २ मार्च सकाळी ६.३९ वाजता

आमलकी एकादशी तिथी समाप्त: ३ मार्च सकाळी ९.११ वाजता

आमलकी एकादशीला विष्णूपूजेचा मुहूर्त: सकाळी ६.४५ ते ११.०६

आमलकी एकादशीला कोणते उपाय करावेत?

आमलकी एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूची पूजा केली जाते आणि धार्मिक मान्यतेनुसार श्रीविष्णूंना पिवळ्या रंगाची फुले अर्पण केल्यास ते प्रसन्न होतात. या दिवशी भगवान विष्णूंना २१ पिवळ्या रंगाची फुले अर्पण करा. शक्य असल्यास त्यांचा हार बनवावा आणि भगवान विष्णूंना अर्पण करा.

जर एखाद्या व्यक्तीला नोकरी किंवा व्यवसायात अडचणी येत असतील तर आमलकी एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाला भरपूर पाणी अर्पण करा आणि भगवान विष्णूचे ध्यान करा.

आमलकी एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते आणि या वेळी आवळ्याच्या झाडाला सात प्रदक्षिणा करावी आणि सात वेळा धागा बांधावा. यामुळे वैवाहिक जीवनात आनंद येतो आणि जोडीदाराची प्रत्येक इच्छा पूर्ण होते.

जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर आमलकी एकादशीच्या दिवशी पिवळ्या रंगाच्या कपड्यात एक नारळ गुंडाळा. पूजेनंतर हा नारळ स्वच्छ ठिकाणी किंवा तिजोरीत ठेवावा. यामुळे लक्ष्मीची कृपा कायम राहते.

जर तुम्हाला भगवान विष्णूचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर आमलकी एकादशीच्या दिवशी त्यांची विधीपूर्वक पूजा करा आणि श्रीविष्णूंना चंदनाचा टिळा लावा.

(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)

 

WhatsApp channel

विभाग