मराठी बातम्या  /  religion  /  Swastik : स्वस्तिक या शब्दाचा नेमका अर्थ काय?, ते काढताना कोणत्या गोष्टींची घ्यावी काळजी?
स्वस्तिक चिन्हाचा अर्थ काय आहे
स्वस्तिक चिन्हाचा अर्थ काय आहे (हिंदुस्तान टाइम्स)

Swastik : स्वस्तिक या शब्दाचा नेमका अर्थ काय?, ते काढताना कोणत्या गोष्टींची घ्यावी काळजी?

01 April 2023, 13:17 ISTDilip Ramchandra Vaze

Meaning Of Swastik : हे स्वस्तिकचं चिन्हं नेमकं कशाचं प्रतीक आहे आणि स्वस्तिक काढताना कोणत्या गोष्टींची आपल्याला काळजी घेतली पाहिजे हे आपण जाणून घेण्याचा प्रतत्न करणार आहोत.

भारतीय संस्कृतीत स्वस्तिकला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालं आहे. कोणतंही शुभ काम करताना आधी स्वस्तिक काढलं जातं. घरातल्या उंबरठ्यापासून ते घरात होणारं शुभ कार्य असो. एखादा मंगल कार्यक्रम असो किंवा अगदी सत्यनारायणाची पूजा असो. प्रत्येक ठिकाणी स्वस्तिक काढल्याशिवाय तो कार्यक्रम पुढे जात नाही. मात्र हे स्वस्तिकचं चिन्हं नेमकं कशाचं प्रतीक आहे आणि स्वस्तिक काढताना कोणत्या गोष्टींची आपल्याला काळजी घेतली पाहिजे हे आपण जाणून घेण्याचा प्रतत्न करणार आहोत.

ट्रेंडिंग न्यूज

काय आहे स्वस्तिक चिन्हाचा अर्थ

स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीचे शुभप्रतीक आहे. स्वस्तिकचा सुचक अर्थ 'कल्याण असो' असा आहे. स्वस्तिक मध्ये सूर्य, इंद्र, वायु, पृथ्वी, लक्ष्मी, विष्णू, ब्रम्हदेव, शिवपार्वती,श्रीगणेश अशा अनेक देवतांचा समावेश होत असतो. शांती,समृद्धी आणि मंगल यांचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक.

असं काढावं स्वस्तिक

तुम्ही हळद किंवा शेंदुराने स्वस्तिक चिन्ह बनवू शकता.

कोणती दिशा स्वस्तिक काढण्यासाठी उत्तम आहे

जर आपण दिशेबद्दल बोलणार असू तर स्वस्तिक काढण्यासाठी उत्तर-पूर्व दिशा सर्वोत्तम आहे. पूजेच्या ठिकाणी किंवा घराच्या मुख्य दरवाजावरही स्वस्तिकचे प्रतीक बनवू शकता. असे केल्याने देवी मातेच्या कृपेने तुम्हाला शुभ परिणाम तर मिळतात, याशिवाय वास्तुशी संबंधित समस्यांच्या नकारात्मक प्रभावापासूनही मुक्ती मिळते. स्वस्तिकचे चिन्ह घरात सकारात्मकता आणते असे मानले जाते.

स्वस्तिक बनवताना कोणत्या गोष्टींची घ्याल काळजी

घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यात आणि मंदिरात स्वस्तिक काढल्याने वास्तुदोष दूर होतात. या दोन्ही ठिकाणी हळदीने स्वस्तिक बनवा आणि त्याखाली 'शुभ लाभ' असे लिहा. असे केल्याने तुमच्या घरात नेहमी सकारात्मकता राहील. यासोबतच लक्ष्मीची कृपाही कायम राहील. लक्षात ठेवा स्वस्तिकचे चिन्ह ९ बोटे लांब आणि रुंद असावे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

विभाग