Swapna Shastra : स्वप्नात देवी पाहाण्याचा नेमका काय आहे अर्थ?
Dream Interpretation : नवरात्रीच्या निमित्ताने काहींच्या स्वप्नात दुर्गा देवी आलेली पाहायला मिळते. मग स्वप्नात देवी पाहायला मिळणं याचा काय अर्थ आहे असा आपण विचार करतो.
सध्या चैत्र नवरात्र सुरू आहे. चैत्र नवरात्र आणि त्या संदर्भात आपल्याला पडणारी स्वप्न याबाबत आज आपण बोलणार आहोत. नवरात्रीच्या निमित्ताने काहींच्या स्वप्नात दुर्गा देवी आलेली पाहायला मिळते. मग स्वप्नात देवी पाहायला मिळणं याचा काय अर्थ आहे असा आपण विचार करतो. खरंतर स्वप्न पाहाणं ही एक सर्वसामान्य प्रक्रीया आहे. रात्री झोपल्यावर सर्वजण स्वप्नं पाहातात.कधी एखादं भयानक स्वप्न आपल्याला झोपेतुन खडबडून जागं करतं तर कधी एखादं मजेशीर स्वप्न आपल्याला पोट धरुन हसवतं. कधी एखादं गूढ आपल्याला विचार करायला भाग पाडतं तर कधी आपल्या आसपास झालेल्या घटनाही आपल्याला स्वप्नात पाहायला मिळतात. स्वप्न ज्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीची असतात, त्याचप्रमाणे प्रत्येक स्वप्नाचा काहीतरी खास अर्थ दडलेला असतो असं स्वप्नशास्त्र सांगतं. आज आपण अशाच एका स्वप्नाबद्दल बोलणार आहोत.
ट्रेंडिंग न्यूज
स्वप्नात देवी दिसण्याचा काय आहे अर्थ
जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात देवी पार्वती दिसली तर कोणत्याही कामात तुम्हाला यश मिळणार आहे असा त्याचा अर्थ असतो.
जर एखाद्याला स्वप्नात माता लक्ष्मी दिसली तर ते एक शुभ चिन्ह आहे आणि याचा अर्थ असा आहे की तुमचे भाग्य लवकरच बदलणार आहे.
स्वप्नशास्त्रानुसार, जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात माता दुर्गा वारंवार लाल कपड्यांमध्ये दिसत असेल, तर हे खूप शुभ चिन्ह आहे. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यात लवकरच काही चांगली बातमी येणार आहे आणि तुमच्या करिअरमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.
स्वप्नग्रंथानुसार माता दुर्गेचे उदास रूप स्वप्नात दिसले किंवा माता राणी काळ्या कपड्यात दिसली तर ते अशुभ मानले जाते. तुमच्या आयुष्यात काहीतरी वाईट घडणार असल्याचे ते संकेत आहेत.
जर एखाद्या जोडप्याला बऱ्याच काळापासून संततीची इच्छा असेल आणि त्यांना स्वप्नात माता भगवती दिसली तर त्यांची ही इच्छा लवकरच देवीच्या आशिर्वादाने पूर्ण होईल हे त्यांनी समजावं.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)