हिंदु धर्मात अमावस्या आणि पौर्णिमा यांना अनन्य साधारण महत्व आहे. आगामी १९ मे २०२३ रोजी वैशाख अमावस्या येत आहे. वैशाख अमावस्येनंतर जेष्ठ महिन्याला सुरूवात होणार आहे. या अमावस्येला दर्श अमावस्या म्हणूनही ओळखलं जातं. त्याशिवाय वैशाख अमावस्येलाच शनैश्चर जयंतीही साजरी केली जाणार आहे. एकंदरीतच वैशाख पौर्णिमा आणि त्यानंतरचा जेष्ठ महिना आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. वैशाख अमावस्येला कोणत्या गोष्टी कराव्यात असं हिंदू धर्मशास्त्रात सांगण्यात आलं आहे ते आपण पाहाणार आहोत.
धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षात भगवान विष्णू, ब्रह्मा आणि महेश यांचा वास असतो, अशा स्थितीत अमावस्या तिथीच्या दिवशी वटवृक्षाची विधिवत पूजा केल्यास नोकरी-व्यवसायातील अडचणी दूर होतात, प्रगती होते.
ज्येष्ठ अमावस्येला पहाटे उठून पवित्र नदीत स्नान करून तीळ, दूध आणि तिळापासून बनवलेली मिठाई गरीब व गरजूंना दान केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि सुखात वृद्धी होते.
शनि जयंतीही ज्येष्ठ अमावस्येला असते, त्यामुळे या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मुळास कच्चे दूध, काळे तीळ, गंगाजल, साखर, फुले, तांदूळ आणि पाणी अर्पण करावे आणि 'ओम पितृभ्यै नमः' या मंत्राचा जप करावा, अशी श्रद्धा आहे. असे केल्याने प्रत्येक कार्य सफल होते आणि व्रत करणाऱ्या व्यक्तीला सर्व क्षेत्रांत यशही मिळते.
हे व्रत विवाहित महिलांसाठी खास आहे. यावेळी ज्येष्ठ अमावस्येला अनेक दुर्मिळ योगायोग घडत आहेत, अशा स्थितीत पूजा आणि स्नानाव्यतिरिक्त काही उपाय केले तर व्रत करणाऱ्याला अनेक पटींनी अधिक लाभ मिळतात.