चैत्र महिन्याची सुरूवात झाली आणि लागोपाठ सण उत्सवांची जणू मालिकाच सुरू झाली आहे.शनिवारी आपण विनायक चतुर्थी साजरी केली आणि गणरायाकडे आपण बुद्धीचं वरदान मागितलं. त्यापाठोपाठ आज म्हणजेच रविवार दिनांक २६ मार्च २०२३ रोजी आपण श्री पंचमी किंवा श्री लक्ष्मी पंचमी साजरी करत आहोत. हे व्रत श्री लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी केलं जातं. हे व्रत केल्यास कुटुंबात समृद्धी येते.श्री लक्ष्मी पंचमी आज दुपारी २ वाजल्यापासून सुरू होईल.
आधी आंघोळ करून एका पाटावर लाल कापड किंवा भगवं कापड अंथरून देवी लक्ष्मी आणि श्रीविष्णू यांची तसबीर किंवा धातुची मूर्ती ठेवावी. त्यामुर्तीला शुद्ध पाण्याने स्नान घालावं. मूर्ती समोर साजूक तुपातलं निरांजन लावावं आणि सुगंधी उदबत्ती लावावी. त्यानंतर श्री लक्ष्मी मातेची आणि श्री विष्णूंची विधिवत पूजा करावी आणि श्री लक्ष्मी मातेला गोडाचा नैवेद्य दाखवावा. यादिवशी फक्त सात्विक अन्नच खावं.
श्री पंचमीच्या पूजेने काय प्राप्त होतं.
लक्ष्मी मातेला धनाची देवी मानलं गेलं आहे. सहाजिकच शुद्ध अंतकरण आणि भक्तीभावाने देवी लक्ष्मी आणि श्रीविष्णू यांची पूजा केल्यास संपत्ती मिळते असं सांगितलं जातं. खऱ्या भक्तीने केलेली उपासना धन, सुख आणि समृद्धी देते.
श्री पंचमीच्या दिवशी श्रीयंत्राची पूजा स्थापित करणे खूप शुभ आहे.
या दिवशी माता लक्ष्मी साक्षात् श्रीयंत्रात विराजमान असते.
श्रीयंत्राची स्थापना घरामध्ये किंवा व्यावसायिक प्रतिष्ठानमध्ये केल्याने धनाचा ओघ वेगाने वाढतो. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि प्रगतीसाठी लक्ष्मी पंचमी व्रत अवश्य पाळावे.
(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)
संबंधित बातम्या