मराठी बातम्या  /  religion  /  Gudhi Padwa 2023 : नववर्षाच्या दिवशी घरात आणा या गोष्टी, होईल आनंदात वाढ
गुढी पाडवा
गुढी पाडवा (हिंदुस्तान टाइम्स)

Gudhi Padwa 2023 : नववर्षाच्या दिवशी घरात आणा या गोष्टी, होईल आनंदात वाढ

19 March 2023, 10:13 ISTDilip Ramchandra Vaze

Bring These Things On Gudhi Padwa : हिंदूंसाठी अत्यंत महत्वाचा असणारा हा दिवस मोठ्या भक्तीभावात आणि पारंपारिक पालख्या काढून ढोल ताशांच्या गजरात साजरा केला जाईल. अशातच चैत्र नवरात्र देखील याच दिवशी सुरू होत असल्याने यंदा नववर्षाचा उत्साह द्विगुणित झाला आहे. नववर्षाच्या दिवशी काही गोष्टी घरात आणल्यास आपल्या आनंदात आणखी भर पडते.

हिंदू नववर्ष अर्थात चैत्र शुद्ध प्रतिपदेला येणारा पाडवा यंदा २२ मार्च २०२३ रोजी साजरा केला जाणार आहे. हिंदूंसाठी अत्यंत महत्वाचा असणारा हा दिवस मोठ्या भक्तीभावात आणि पारंपारिक पालख्या काढून ढोल ताशांच्या गजरात साजरा केला जाईल. अशातच चैत्र नवरात्र देखील याच दिवशी सुरू होत असल्याने यंदा नववर्षाचा उत्साह द्विगुणित झाला आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

नववर्षाच्या दिवशी काही गोष्टी घरात आणल्यास आपल्या आनंदात आणखी भर पडते. त्या वस्तू कोणत्या आहेत हे पाहूया.

नववर्षाच्या दिवशी घरात आणा या गोष्टी

एक नारळ घरात आणा

एक छोटा नारळ घरी आणा आणि तो नारळ लाल कपड्यात गुंडाळा आणि तिजोरीत ठेवा. यामुळे घरातील सुख-शांती कायम राहते आणि धनही प्राप्त होते. 

तुळशीचे रोप आणा

हिंदू नववर्षानिमित्त घरी तुळशीचे रोप आणा. हे घरामध्ये लावल्याने घरातील सकारात्मकता कायम राहते.

धातूचे कासव आणा

घरात धातूचे कासव आणल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते आणि वाईट शक्तींचाही नाश होतो. यामुळेही घरात सुख-शांती नांदते.

मोती शंख आणा 

घरामध्ये मोती शंख ठेवल्याने धन प्राप्ती होते. घरात आणा आणि पूजा केल्यानंतर पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवा. यामुळे प्रगतीचे सर्व मार्ग खुले होतील आणि कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. 

मोराचे पिसे आणा 

भगवान श्रीकृष्णाला मोराचे पंख अत्यंत प्रिय आहेत. ज्या घरात मोरपंख असतात, त्या घरात लक्ष्मीचा वास असतो. हिंदू नववर्षापूर्वी घरात मोराची पिसे आणा.  

लाफिंग बुद्ध घरात आणा 

लाफिंग बुद्ध आणा. उत्तर-पूर्व दिशेला ठेवा. त्यामुळे घरात पैशांची कमतरता भासत नाही

(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)

विभाग