Vaishakha Amavasya 2023 : करिअरमध्ये घ्यायची आहे उत्तुंग झेप?, मग वैशाख अमावस्येला करा हे उपाय
Vidhi Upay For Career : जर तुम्हाला करिअरमध्ये सतत अपयश येत असेल किंवा काही चिंता सतावत असेल तर वैशाख अमावस्येला काही उपाय सांगण्यात आले आहेत.
वैशाख महिना संपत आला आहे. मात्र वैशाखाच्या वणव्याचे चटके संपूर्ण महाराष्ट्राला बसताना पाहायला मिळत आहेत. राज्यभर उष्णतेची तीव्र लाट नको जीव करत आहे. मात्र येत्या १९ मे २०२३ रोजी वैशाख अमावस्या येत आहे. ही वैशाख अमावस्या या महिन्याचा शेवटचा दिवस आणि जेष्ठ महिन्याचा आरंभ अशी असणार आहे.
ट्रेंडिंग न्यूज
जर तुम्हाला करिअरमध्ये सतत अपयश येत असेल किंवा काही चिंता सतावत असेल तर वैशाख अमावस्येला काही उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये आवश्यक असलेली झेप घेण्यास मदत होऊ शकते. काही अत्यंत सोपे उपाय आहेत, जे केल्याने तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये उत्तुंग यश गाठण्यास मदत होईल. कोणते आहेत ते उपाय आपण पाहूया.
वैशाख अमावस्येला कोणते उपाय करावेत?
वैशाख अमावस्येची तिथी पितरांना समर्पित आहे आणि या तिथीतील देवता पितृगण मान्य करतात. अशा स्थितीत या दिवशी काळे तीळ, गंगाजल, साखर आणि पांढरी फुले वाहावीत. तर्पण करावं आणि 'ओम पितृभ्यै नमः' चा जप करावा. ' या मंत्राचा जप केल्याने सात पिढ्यांची पापं नष्ट होतात अशी श्रद्धा आहे.
याशिवाय या दिवशी संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपर्यात तुपाचा दिवा लावावा. याने घरात लक्ष्मी देवी वास करते आणि आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते.
अमावस्या तिथीला संध्याकाळी काळ्या श्वानाला मोहरीच्या तेलात पोळी किंवा भाकरी खाऊ घालणे शुभ मानले जाते.
त्याचबरोबर करिअर आणि व्यवसायात प्रगती होते. अमावस्येला तुम्ही काळ्या श्वानाची सेवा करू शकता, यामुळे अनेक फायदे होतात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
विभाग