मराठी बातम्या  /  religion  /  Garuda Purana : सर्वात मोठं पाप काय आहे?, काय सांगतं गरूड पुराण?, त्याची काय मिळते शिक्षा?
पाप आणि त्यांची शिक्षा
पाप आणि त्यांची शिक्षा (Hindu FAQS)

Garuda Purana : सर्वात मोठं पाप काय आहे?, काय सांगतं गरूड पुराण?, त्याची काय मिळते शिक्षा?

24 May 2023, 7:45 ISTDilip Ramchandra Vaze

Garuda Purana Sins & Punishments : काही गोष्टी अशा ज्या आजिबात करू नये, असं गरूड पुराणात सांगण्यात आलं आहे. अशा पापांची काय शिक्षा मिळते, सर्वात मोठं पाप काय आहे हे आज आपण पाहाणार आहोत.

गरूड पुराणाचे प्रमुख देवता भगवान विष्णू आहेत. यामध्ये भक्ती, ज्ञान, शांतता, सदाचार, नि:स्वार्थी कार्याच्या महिमाबरोबरच यज्ञ, दान, तपश्चर्या, तीर्थयात्रा इत्यादी शुभ कर्मांमध्ये सर्वसामान्यांना प्रवृत्त करण्यासाठी अनेक लौकिक व इतर ऐहिक फलांचे वर्णन केले आहे. याशिवाय आयुर्वेद, नीतिशास्त्र इत्यादी विषयांच्या वर्णनाबरोबरच मृत आत्म्याच्या शेवटच्या क्षणी करावयाच्या कृतींचे तपशीलवार वर्णन केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आज आपण गरूड पुराणानुसार सर्वात मोठं पाप काय आहे? आणि त्याची मृत्यूपश्चात काय शिक्षा मिळते?, हे पाहाणार आहोत.

इतरांचे पैसे लुबाडण्याची काय मिळते शिक्षा?

गरूड पुराणानुसार जे इतरांचे पैसे लुटतात किंवा इतरांची संपत्ती हडप करतात, त्या व्यक्तींना महापापी मानण्यात आलं आहे. असे मानले जाते की अशा लोकांच्या मृत्यूनंतर यमदूत त्यांना दोरीने बांधून नरकात घेऊन जातात आणि त्यांना एवढी मारहाण करतात की मार खाल्ल्यानंतर ते बेशुद्ध होतात आणि नंतर शुद्धीवर आल्यावर त्यांची हत्या केली जाते.

जेष्ठांचा अनादर करणाऱ्यांना काय मिळते शिक्षा?

गरूड पुराणानुसार जे मोठ्यांचा अनादर करतात ते कधीच सुखी राहत नाहीत. त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळते. मृत्यूनंतरही त्यांना नरकयातना भोगाव्या लागतात. गरुड पुराणात सांगितले आहे की, जे ज्येष्ठांचा अपमान करतात किंवा त्यांचा छळ करतात, अशा पापी लोकांना नरकाच्या आगीत टाकले जाते आणि त्यांची त्वचा शरीरापासून वेगळी होईपर्यंत त्यांना या आगीत होरपळवले जाते.

स्वार्थासाठी निष्पाप जीवांची हत्या करणाऱ्यांना काय मिळते शिक्षा?

आपल्या स्वार्थासाठी निष्पाप जीवांची हत्या करणाऱ्या लोकांनाही नरकयातना भोगाव्या लागतात. गरुड पुराणात असे म्हटले आहे की जे निष्पाप जीवांना मारून आपली वासना तृप्त करतात त्यांना नरकात खूपच कठोर शिक्षा दिली जाते. अशा पापी व्यक्तींना एका मोठ्या कढईत गरम तेलामध्ये तळले जाते.

फक्त सुखासाठी एकत्र असणाऱ्या पती-पत्नींना काय मिळते शिक्षा?

गरूड पुराण सांगतं की, जे पती-पत्नी एकमेकांची गरज आहे तोपर्यंत एकमेकांसोबत राहतात किंवा जोपर्यंत ते एकमेकांच्या संपत्तीचा उपभोग घेऊ शकतील तोवरच एकत्र राहातात, अशा पती-पत्नीला मृत्यूनंतर नरक भोगावा लागतो. गरुड पुराणानुसार अशा लोकांना नरकात गरम लोखंडी सळ्यांनी मारले जाते.

यज्ञ करूनही मास खाणाऱ्या लोकांना काय मिळते शिक्षा?

गरुड पुराणात वर्णिलेल्या धर्म कर्माच्या संदर्भात असेही म्हटले आहे की, जे लोक यज्ञ केल्यानंतर प्राण्यांचे मांस खातात, अशा लोकांना नरकात आणून प्राण्यांमध्ये सोडले जाते. त्यानंतर हे भटके प्राणी त्या व्यक्तीला ओरबाडून खातात.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग