हिंदू धर्मात उपवासाला खूप महत्त्व आहे. उपवासाच्या काळात सात्विक आहाराचे पालन करण्याचा सल्ला दिला जातो. उपवासाता सात्विक अन्न ग्रहण करण्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. तसेच, याचे अनेक नियमदेखील आहेत.
असे म्हटले जाते, की उपवास करताना सात्विक राहणे फार महत्वाचे आहे, अन्यथा उपवासाचा प्रभाव नाहीसा होतो. चला तर मग जाणून घेऊया उपवासात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे आणि कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये?
उपवासात सात्विक अन्न सेवन केल्याने साधकाची शुद्धता, संतुलन आणि सुसंवाद कायम राहतो. तसेच, हे अन्न चांगले आरोग्य राखण्यासाठी पुरेशी ऊर्जा प्रदान करते. सात्विक अन्न पूर्णपणे शुद्ध मानले जाते आणि हे अन्न मन शुद्ध ठेवण्यास देखील मदत करते. मन शुद्ध असणे हे अध्यात्मिक साधना तसेच ध्यानासाठी खूप महत्वाचे आहे.
सात्विक भोजनामध्ये फळं, दुग्धजन्य पदार्थ, सुका मेवा, साबुदाणा, बटाटे, शेंगदाणे, मावा मिठाई इत्यादींचा समावेश होतो. तळलेल्या वस्तूंचा यात समावेश होत नाही.
तामसिक अन्नामध्ये लसूण, कांदा, मांस, मसालेदार आणि आंबवलेले पदार्थ इत्यादींचा समावेश होतो. त्यांचे सेवन केल्याने व्यक्तीला जडत्व, गोंधळल्यासारखे वाटणे आणि दिशाहीनता जाणवते. त्याच वेळी, व्यक्ती पूर्णपणे क्षीण होते. त्यामुळे अध्यात्मिक कार्य करताना या पदार्थांचे सेवन करू नये.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या