मराठी बातम्या  /  religion  /  Pradosh Vrat 2023 : मार्च महिन्यातलं रवी प्रदोष व्रत कधी आहे?, त्याचं महत्व काय आहे?
रवी प्रदोष व्रत
रवी प्रदोष व्रत (हिंदुस्तान टाइम्स)

Pradosh Vrat 2023 : मार्च महिन्यातलं रवी प्रदोष व्रत कधी आहे?, त्याचं महत्व काय आहे?

18 March 2023, 7:11 ISTDilip Ramchandra Vaze

Ravi Pradosh Vrat : रविवारी येणारं प्रदोष व्रत म्हणून याला रवी प्रदोष असं ओळखण्यात येणार आहे. या दिवशी भोलेनाथासोबत सूर्यदेवाची पूजा करणारी व्यक्ती. त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

मार्च महिन्यात रवी प्रदोष व्रत केलं जाणार आहे. भगवान शिवशंकराची पूजा करण्याचा सर्वोत्तम कालावधी म्हणजे प्रदोष म्हणून पाहिलं गेलं आहे. रविवारी येणारं प्रदोष व्रत म्हणून याला रवी प्रदोष असं ओळखण्यात येणार आहे. हे प्रदोष व्रत मार्च महिन्याच्या १९ तारखेला म्हणजेच १९ मार्च २०२३ रोजी पाळलं जाईल.

ट्रेंडिंग न्यूज

रवी प्रदोषाचा शुभ मुहूर्त कोणता

१९ मार्च रोजी प्रदोष काल सकाळी ०६.३४ ते ०८.५४ पर्यंत असेल. या मुहूर्तावर शंकराची पूजा करता येते.

रवी प्रदोष व्रताचं महत्व काय

या दिवशी भोलेनाथासोबत सूर्यदेवाची पूजा करणारी व्यक्ती. त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. यासोबतच भगवान शंकराची कृपाही कायम राहते. दुसरीकडे रवि प्रदोष व्रत केल्याने माणसाला आरोग्य प्राप्त होते. तसेच, आयुर्मान दीर्घ आहे.

रवी प्रदोष व्रताची कथा काय आहे

पौराणिक कथेत सांगितलं गेल्याप्रमाणे एका गावात एक ब्राम्हण कुटुंब राहात होतं. हे कुटुंब अत्यंत देवभोळं होतं. एकेदिवशी ब्राम्हण परिवाराचा मुलगा नदीवर आंघोळीला गेला असता तिथे त्याला काही चोरांनी पकडलं आणि त्याला “तुमच्या घरात गुप्तधन कुठे आहे हे सांग?” असं दरडावलं. “आमच्याकडे कोणतंही गुप्तधन नाही”, असं त्या मुलाने सांगताच त्या गरीब ब्राम्हणाच्या मुलाला एकटं सोडून ते चोर तिथुन पळून गेले. मात्र त्या चोरांना शोधत आलेल्या सैनिकांना या थकलेल्या मुलाला पाहिलं आणि त्याला त्या चोरांपैकी एक समजून तुरुंगात टाकलं. या मुलाचे आई वडील मात्र आपल्या मुलाची वाट पाहात बसले. सूर्यास्तानंतरही मुलगा घरी परत आला नाही हे पाहून त्याच्या आईने प्रदोष व्रत केलं. भगवान शंकराने त्या देवभोळ्या स्त्रीचं व्रत मान्य केलं आणि राजाला स्वप्नात दृष्टांत दिला. “तू पकडलेला मुलगा ब्राह्मणाचा मुलगा आहे. त्याला सोडा, तो निर्दोष आहे. तू त्या मुलाला सोडलं नाहीस तर तुझे सर्व राज्य नष्ट होईल” असं शंकराने त्या राजाला स्वप्नात सांगितलं. त्यानंतर दुसर्‍या दिवशी राजाने त्या ब्राह्मण पुत्राला सोडून त्याची माफी मागितली आणि आपली चूक सुधारण्यासाठी ५ गावे त्यामुलाच्या नावावर केली अशी आहे रविवार प्रदोष व्रत कथा.

 

विभाग