Papmochani Ekadashi 2023 : पापमोचनी एकादशी म्हणजे काय? त्याचे शुभ मुहूर्त कोणते?
Importance Of Papmochani Ekadashi : श्रीकृष्णाने पांडवांपैकी एक असणाऱ्या धर्मराजाला अर्थात युधिष्ठीरालाही या एकादशीचं महत्व सांगितल्याचा उल्लेख पुराणात पाहायला मिळतो.
पापमोचनी एकादशी अर्थात जीवनात केलेली सर्व पापं धुवून काढणारी एकादशी म्हणून पापमोचनी एकादशीकडे पाहिलं जातं. ही एकादशी भगवान श्रीविष्णूंना प्रिय आहे. शनिवारी म्हणजेच १८ मार्च २०२३ रोजी पापमोचनी एकादशी साजरी केली जाईल. हिंदू पंचांगानुसार सांगायचं झालं तर फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातल्या एकादशीच्या दिवशी हे व्रत साजरं केलं जातं.श्रीकृष्णाने पांडवांपैकी एक असणाऱ्या धर्मराजाला अर्थात युधिष्ठीरालाही या एकादशीचं महत्व सांगितल्याचा उल्लेख पुराणात पाहायला मिळतो.
ट्रेंडिंग न्यूज
पापमोचनी एकादशीची तारीख आणि शुभ मुहूर्त कोणते
हिंदू कॅलेंडरनुसार, फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीची तारीख शुक्रवार, १७ मार्च रोजी दुपारी २.०६ पासून सुरू होत आहे आणि ही तिथी शनिवार १८ मार्च रोजी सकाळी ११.१३ पर्यंत वैध असेल. उदयतिथीच्या निमित्ताने १८ मार्च रोजी पापमोचनी एकादशीचे व्रत पाळले जाणार आहे
पापमोचनी एकादशीला निर्माण होत आहेत चार शुभ योग
पापमोचनी एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योगासह चार शुभ योग तयार झाले आहेत. या दिवशी सकाळपासून रात्री ११.५४ पर्यंत शिवयोग असून त्यानंतर सिद्धयोग सुरू होईल. सर्वार्थ सिद्धी योग सकाळी ०६.२८ ते रात्री १२.२९ पर्यंत आहे. द्विपुष्कर योग रात्री उशिरा १२.२९ ते दुसऱ्या दिवशी १९ मार्च रोजी सकाळी ०६.२७ पर्यंत आहे.
पापमोचनी एकादशी पूजेच्या वेळा २०२३
पापमोचनी एकादशीच्या दिवशी सकाळी सर्वार्थ सिद्धी योगाने भगवान विष्णूच्या उपासनेचा शुभ मुहूर्त सुरू होईल. सर्वार्थ सिद्धी योगात उपासना केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. या दिवशी तुम्ही सकाळी ०६.२८ पासून पापमोचनी एकादशी व्रताची पूजा करू शकता. या दिवशी पूजेच्या वेळी राहुकालाची मात्र काळजी घ्यावी लागेल.
विभाग