मराठी बातम्या  /  धर्म  /  Kaal Sarp Dosh : कालसर्प दोष म्हणजे काय? तो असल्यास करा हे तीन प्रभावी उपाय

Kaal Sarp Dosh : कालसर्प दोष म्हणजे काय? तो असल्यास करा हे तीन प्रभावी उपाय

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 29, 2024 02:46 PM IST

Kaal Sarp Dosh : काल सर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान शंकराची विशेष उपासना केली जाते, यामुळे काल सर्प दोषाचा प्रभाव नाहीसा होतो.

Kaal Sarp Dosh
Kaal Sarp Dosh (Samir Kar)

ज्योतिषशास्त्रानुसार अनेक प्रकारचे ग्रह दोष असतात. यातील एक ग्रह दोष म्हणजे काल सर्प दोष. आज आपण याच काल सर्प दोषाबाबत जाणून घेणार आहोत. सोबतच काल सर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत, हे देखील याठिकाणी जाणून घेणार आहोत.

काल सर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान शंकराची विशेष उपासना केली जाते, यामुळे काल सर्प दोषाचा प्रभाव नाहीसा होतो, असे मानले जाते. तसेच, सोमवार हा भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो. 

 काल सर्प दोष म्हणजे काय?

ज्योतिषशास्त्रानुसार, जर एखाद्याच्या कुंडलीत राहू आणि केतू यांच्यामध्ये ग्रह आले तर या दोषाला कालसर्प दोष म्हणतात. तसचे, त्या व्यक्तीच्या जीवनात या ग्रहांच्या स्थितीनुसार काल सर्प दोष होतो. काल सर्प दोषाचे १४ प्रकार असून यात वेगवेगळे परिणाम दिसून येतात. 

ज्याप्रमाणे व्यक्तीच्या कुंडलीत शनिदोष, मंगल दोष किंवा इतर दोष असतात, त्याचप्रमाणे काल सर्प दोष देखील असतो. या दोषामुळे माणूस आयुष्यभर त्रस्त राहतो आणि प्रत्येक मार्गात अपयशाचा सामना करावा लागतो. खूप मेहनत करूनही कोणतेही काम पूर्ण होत नाही आणि शेवटी निराशाच हाती येते. हे सर्व व्यक्तीच्या पूर्वीच्या कर्मानुसार ठरलेले असते.

काल सर्प दोष दूर करण्याचे उपाय

महादेव स्वतः गळ्यात नाग धारण करतात हे तुम्हाला माहीतच आहे. अशा स्थितीत तुम्ही ताबडतोब महादेवाच्या चरणी नतमस्तक व्हावे. सोमवारी विशेष पूजा करावी. असे केल्याने तुम्हाला भगवान शंकराचा आशीर्वाद मिळेल आणि काल सर्प दोषाचा प्रभाव हळूहळू कमी होईल.

सोमवारच्या दिवशी ५, ७, ९ किंवा ११ अशा विषम अंकांमध्ये १०८ ग्रेन रुद्राक्ष जपमाळांसह ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा, असे केल्याने काल सर्प दोषाचा प्रभाव कमी होतो.

उपासना पद्धतीनुसार काल सर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही पूर्ण विधींनी रुद्राभिषेक करू शकता. असे केल्याने महादेव लवकरच प्रसन्न होतील आणि तुमच्यापासून हा अडथळा दूर करतील.

WhatsApp channel

विभाग