Shivling Puja : शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यांच्यात नेमका फरक काय? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Shivling Puja : शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यांच्यात नेमका फरक काय? जाणून घ्या

Shivling Puja : शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यांच्यात नेमका फरक काय? जाणून घ्या

May 17, 2024 05:10 PM IST

Shivling Puja : सनातन धर्मात शिवलिंगाला भगवान शंकराचे रूप मानले जाते. हिंदू धर्मग्रंथांमध्ये शिवलिंगाच्या पूजेचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ज्योतिर्लिंग देखील भगवान शिवाशी संबंधित मानले जाते.

Shivling Puja : शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यांच्यातील नेमका फरक काय? जाणून घ्या
Shivling Puja : शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यांच्यातील नेमका फरक काय? जाणून घ्या (AFP)

difference between shivling and jyotirlinga : सनातन धर्मात शिवलिंगाला भगवान शंकराचे रूप मानले जाते. हिंदू धर्मग्रंथांमध्ये शिवलिंगाच्या पूजेचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ज्योतिर्लिंग देखील भगवान शिवाशी संबंधित मानले जाते.

शिवपुराणात सांगितल्यानुसार, शिवलिंगावर जल अर्पण केल्याने मनुष्याला पुण्य प्राप्त होते. त्याचबरोबर ज्योतिर्लिंगाची पूजा केल्याने साधकाला शुभ फळ मिळू शकतात. पण बरेच लोक ज्योतिर्लिंग आणि शिवलिंग यांना एकच मानतात, पण ज्योतिर्लिंग आणि शिवलिंग यांच्यात खूप फरक आहे.

ज्योतिर्लिंगाचा अर्थ

देशभरात प्रामुख्याने १२ ज्योतिर्लिंगांची स्थापना झाली आहे. शिवपुराणानुसार जिथे जिथे ज्योतिर्लिंगाची स्थापना केली जाते तिथे भगवान शिव स्वतः प्रकाशाच्या रूपात जन्मले होते, अशी मान्यता आहे. अशा प्रकारे, ज्योतिर्लिंग हे भगवान शंकराचे स्वरूप आहे जे 'स्वयंभू' आहे, म्हणजेच ते स्वतःच घडणार आहे.

ही १२ ज्योतिर्लिंगे १२ राशींचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे या १२ ज्योतिर्लिंगांचे विशेष महत्त्व मानले जाते. तसेच, जो व्यक्ती आपल्या जीवनात या १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतो तो भगवान शंकराचा विशेष आशीर्वाद प्राप्त करू शकतो, अशी मान्यता आहे. 

देशातील १२ ज्योतिर्लिंगे पुढीलप्रमाणे 

सोमनाथ ज्योतिर्लिंग - गुजरात

मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग - आंध्र प्रदेश

महाकालेश्वर ज्योतिर्लिंग - मध्य प्रदेश

ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग - मध्य प्रदेश

केदारनाथ ज्योतिर्लिंग - उत्तराखंड

भीमाशंकर ज्योतिर्लिंग - महाराष्ट्र

काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग - उत्तर प्रदेश

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग - महाराष्ट्र

वैद्यनाथ ज्योतिर्लिंग - झारखंड

नागेश्वर ज्योतिर्लिंग - गुजरात

रामेश्वरम ज्योतिर्लिंग - तामिळनाडू

घुष्णेश्वर ज्योतिर्लिंग - महाराष्ट्र

शिवलिंगाचा अर्थ

शिवलिंगाचा अर्थ शास्त्रात वर्णन केलेला आहे - अनंत, म्हणजेच ज्याला सुरुवात नाही आणि अंतही नाही. शिवलिंग हे भगवान शिव आणि माता पार्वतीचे शाश्वत एकच रूप आहे. त्याच वेळी 'लिंग' म्हणजे प्रतीक. त्यामुळे शिवलिंग हे शिवाचे प्रतीक मानले जाते. शिवलिंगाची निर्मिती मानवाने शिवाचे प्रतिक म्हणून केली आहे आणि पूजा करण्यासाठी मंदिरांमध्ये स्थापना केली आहे.

'स्वयंभू' मानली जाणारी अनेक शिवलिंगे आहेत. काही भक्त त्यांच्या घरातील मंदिरात शिवलिंगाची छोटीशी मूर्ती ठेवतात आणि त्याची नियमित पूजा करतात. शिवलिंगाच्या पूजेदरम्यान भगवान शंकराला दूध, दही, फुले आणि फळेही अर्पण केली जातात.

 

 

 

 

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)े

Whats_app_banner