मराठी बातम्या  /  Religion  /  What Is Garuda Purana

Garuda Purana : घरातील सदस्याच्या मृत्यूनंतर गरूड पुराणाचा पाठ का करावा?

गरूड पुराण
गरूड पुराण (Unsplash)
Dilip Ramchandra Vaze • HT Marathi
May 23, 2023 07:09 AM IST

Importance Of Garuda Purana : आज आपण पाहाणार आहोत की, घरातील सदस्याच्या मृत्यूनंतर घरात गरूड पुराण का वाचलं जातं किंवा त्याचा पाठ का केला जातो.

हिंदू धर्मात गरूड पुराणाला अत्यंत महत्वाचा ग्रंथ म्हणून मान्यता मिळाली आहे. भगवान विष्णू गरूडराजाला जन्म आणि मृत्यू याबद्दलची काही रहस्य सांगतात. आज आपण पाहाणार आहोत की, घरातील सदस्याच्या मृत्यूनंतर घरात गरूड पुराण का वाचलं जातं किंवा त्याचा पाठ का केला जातो.

ट्रेंडिंग न्यूज

घरातील सदस्याच्या मृत्यूनंतर गरूड पुराणाचा पाठ का करावा?

  • गरुड पुराणात मृत्यूपूर्वी आणि मृत्यू नंतरच्या परिस्थितीचे वर्णन केले आहे. म्हणूनच हे पुराण मृत व्यक्तीला पाठ ऐकवले जाते.
  • १३ दिवसांपर्यंत, मृत व्यक्ती जवळच्या आणि प्रिय व्यक्तींमध्ये राहते. यादरम्यान गरुड पुराणाचे पठण केल्याने त्याला स्वर्ग-नरक, गती, मोक्ष, अधोगती, दुःख इत्यादी गोष्टी समजतात.
  • पुढच्या प्रवासात त्याला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागेल, तो कोणत्या जगात जाऊ शकतो, हे सर्व तो गरुड पुराण ऐकून शिकतो.
  • मृत्यूनंतर जेव्हा घरामध्ये गरुड पुराणाचे पठण केले जाते, तेव्हा या निमित्ताने का होईना, मृत व्यक्तीच्या नातेवाइकांना वाईट काय आहे आणि कोणत्या प्रकारच्या कर्मांमुळे मोक्ष मिळतो हे समजतं, जेणेकरून मृत व्यक्ती आणि त्याच्या नातेवाईकांना हे चांगले कळते की मोक्ष मिळवण्यासाठी कोणती कर्म केली पाहिजेत.
  • गरुड पुराण आपल्याला चांगल्या कर्मांसाठी प्रेरित करते. सत्कर्म आणि सुमतीनेच सद्गती आणि मोक्ष मिळतो.
  • गरुड पुराणात व्यक्तीच्या कर्माच्या आधारे मिळणाऱ्या विविध नरकांच्या बाबतीत माहिती मिळते. गरुड पुराणानुसार, कोणत्या गोष्टी माणसाला मोक्षाच्या दिशेने घेऊन जातात याचे उत्तर भगवान विष्णूने यात देतात.
  • गरुड पुराणात आपल्या जीवनाविषयी अनेक रहस्यमयी गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. ज्यांच्याबद्दल एखाद्या व्यक्तीला माहीत असणे आवश्यक आहे. आत्मज्ञानाचं विवेचन हा गरुड पुराणाचा मुख्य गाभा आहे. गरुड पुराणातील एकोणीस हजार श्लोकांपैकी उर्वरित सात हजार श्लोकांमध्ये ज्ञान, धर्म, नीती, रहस्य, व्यावहारिक जीवन, स्वर्ग, नरक आणि इतर जगाचे वर्णन आढळते.
  • असे म्हणतात की गरुड पुराणाचे पठण ऐकल्याने मृत आत्म्याला शांती मिळते आणि त्याला मोक्षाचा मार्ग कळतो. आपले सर्व दु:ख विसरून तो भगवंताच्या मार्गावर चालतो आणि मोक्ष प्राप्त करतो, मृतव्यक्ती एकतर पितृलोकात जाते किंवा पुन्हा मनुष्यरूपात जन्म घेते. त्याला भुतासारखे भटकत राहावे लागत नाही.
  •  

संबंधित बातम्या