मराठी बातम्या  /  धर्म  /  Garuda Purana : मृत्यूनंतर आत्मा कोणत्या अवस्थेत राहातो?, काय सांगतं गरूड पुराण?

Garuda Purana : मृत्यूनंतर आत्मा कोणत्या अवस्थेत राहातो?, काय सांगतं गरूड पुराण?

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
May 31, 2023 08:01 AM IST

Garuda Purana : आज आपण मृत्यूनंतर व्यक्तीचा आत्मा कोणत्या अवस्थेत राहातो यावर गरूड पुराणात काय माहिती देण्यात आली आहे हे पाहाणार आहोत.

गरूड पुराण
गरूड पुराण

जन्म आणि मृत्यू दोन शाश्वत गोष्टी आहेत असं गरूड पुराणात सांगण्यात आलं आहे. हिंदू धर्म शास्त्रातही याच दोन गोष्टींना महत्व देण्यात आलं आहे. जन्म आणि मृत्यू यामधला काळ म्हणजे जीवन असंही सांगण्यात आलं आहे. गरूड पुराण हे भगवान श्रीविष्णू यांनी आपला सखा गरूड याच्या जन्म आणि मृत्यूबाबत विचारल्या गेलेल्या प्रश्नांची दिलेली उत्तरं आहेत.

या पुराणाचे प्रमुख देवता भगवान विष्णू आहेत. यामध्ये भक्ती, ज्ञान, शांतता, सदाचार, नि:स्वार्थी कार्याच्या महिमाबरोबरच यज्ञ, दान, तपश्चर्या, तीर्थयात्रा इत्यादी शुभ कर्मांमध्ये सर्वसामान्यांना प्रवृत्त करण्यासाठी अनेक लौकिक व इतर ऐहिक फलांचे वर्णन केले आहे. याशिवाय आयुर्वेद, नीतिशास्त्र इत्यादी विषयांच्या वर्णनाबरोबरच मृत आत्म्याच्या शेवटच्या क्षणी करावयाच्या कृतींचे तपशीलवार वर्णन केले आहे. प्रबोधनाची चर्चा हा देखील त्याचा मुख्य विषय आहे.

आज आपण मृत्यूनंतर व्यक्तीचा आत्मा कोणत्या अवस्थेत राहातो यावर गरूड पुराणात काय माहिती देण्यात आली आहे हे पाहाणार आहोत.

गरूड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्मा कोणत्या अवस्थेत राहातो?

गरुड पुराणात असं सांगतं की, जेव्हा आत्मा शरीराचा त्याग करतो, तेव्हा तो प्रथम यमलोकात जातो. तेथे यमदूत २४ तास या आत्म्याला ठेवतात. काळात त्याने केलेल्या कर्मांचा पाढा वाचण्यात येतो. २४ तास पूर्ण झाल्यानंतर, या आत्म्याला १३ दिवसांसाठी त्याच्या नातेवाईकांकडे परत पाठवले जाते, ज्यांच्यासोबत त्याने आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले होते. १३ दिवसांनंतर आत्मा पुन्हा यमलोकाला जायला निघतो.

गरुड पुराणात सांगितल्या प्रमाणे यमलोकाच्या मार्गावर १३ दिवसांनंतर निघालेल्या आत्म्याला स्वर्ग लोक, नरक लोक आणि पितृ लोक असे तीन मार्ग सापडतात. कर्माच्या आधारे त्या माणसाच्या आत्म्याला या तिन्ही लोकांपैकी एका लोकात स्थान मिळते. मनुष्य जीवनात धर्म आणि अध्यात्माच्या मार्गावर चालला तर त्याला देवलोक प्राप्त होतो. जो आपल्या आयुष्यात दुष्कर्म करतो आणि भक्तीपासून दूर राहतो त्याला नरकात स्थान मिळतं असं गरूड पुराणात सांगितलं गेलं आहे.

 

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

संबंधित बातम्या