मराठी बातम्या  /  Religion  /  What Garuda Purana Says About Wife

Garuda Purana : नशीबवान असतो ‘असा पती’ ज्याला मिळते ‘अशी पत्नी’

गरूड पुराण
गरूड पुराण
Dilip Ramchandra Vaze • HT Marathi
Jun 03, 2023 01:28 PM IST

Garuda Purana About Wife : घरात पत्नीच्या रूपात जेव्हा एखादी स्त्री प्रवेश करते तेव्हा ती स्त्री आपल्या वागण्याबोलण्याने घरातलं वातावरण बदलून टाकते. घरातली सर्व जबाबदारी ही स्त्री आपल्या खांद्यावर घेते. गरूड पुराणातही घरातली स्त्री कशी असावी याबाबत वर्णन करण्यात आलं आहे.

गरुड पुराण हे भगवान विष्णूंनी त्यांच्या वाहन गरुडाच्या उत्सुकतेला शांत करण्यासाठी सांगितलेल्या गोष्टींचे संकलन आहे. या पुराणाचे प्रमुख देवता भगवान विष्णू आहेत. यामध्ये भक्ती, ज्ञान, शांतता, सदाचार, नि:स्वार्थी कार्याच्या महिमाबरोबरच यज्ञ, दान, तपश्चर्या, तीर्थयात्रा इत्यादी शुभ कर्मांमध्ये सर्वसामान्यांना प्रवृत्त करण्यासाठी अनेक लौकिक व इतर ऐहिक फलांचे वर्णन केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आज आपण गरूड पुराणात पत्नीचे गुण कसे असावे याबाबत माहिती घेणार आहोत. घरात पत्नीच्या रूपात जेव्हा एखादी स्त्री प्रवेश करते तेव्हा ती स्त्री आपल्या वागण्याबोलण्याने घरातलं वातावरण बदलून टाकते. घरातली सर्व जबाबदारी ही स्त्री आपल्या खांद्यावर घेते. गरूड पुराणातही घरातली स्त्री कशी असावी याबाबत वर्णन करण्यात आलं आहे.

कशी असावी घरातली स्त्री?

गरुड पुराणानुसार, जी स्त्री घर स्वच्छ ठेवते आणि पाहुण्यांना आदराने वागवते ती केवळ तिच्या पतीसाठीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी खूप भाग्यवान असते. कमीसंसाधनातही घर यशस्वीरित्या चालवते अशी स्त्री अत्यंत पुण्यवान मानली जाते आणि देवी लक्ष्मी तिच्यावर प्रसन्न होते.गरुड पुराणानुसार, जी स्त्री घर स्वच्छ ठेवते आणि पाहुण्यांना आदराने वागवते ती केवळ तिच्या पतीसाठीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी खूप भाग्यवान असते.

अशी पत्नी आपल्या पतीसाठी खूप भाग्यवान असते जी पतीला तसेच त्याच्या कुटुंबाला पूर्ण आदर देते. पत्नीमध्ये संयम आणि गोड बोलण्याचे गुण असतील तर ती घरात आनंदाचे वातावरण ठेवते.

गरुड पुराणानुसार जी पत्नी आपल्या पतीच्या सर्व योग्य गोष्टींचे पालन करते आणि त्याला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखते तिला सुलक्षणी स्त्री मानले जाते. यासोबतच जी पत्नी पतीचे मन दुखावण्याचे टाळते, अशा स्त्रीला पतीचे प्रेम आणि आदर दोन्हीही मिळतात. नवपतीशी विश्वासू राहणे हा स्त्रीचा सर्वात मोठा गुण आहे आणि हे तिने लक्षात ठेवले पाहिजे की लग्न झाल्यावर तिला पती मिळताच तिने इतर कोणत्याही पुरुषाशी संबंध ठेवू नयेत. जी पत्नी आपल्या पतीवर प्रेम करते आणि आपल्या पतीशिवाय इतर कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाही, अशा पत्नीचा पती खूप भाग्यवान मानला जातो, हीच बाब त्या नवऱ्याबाबतही लागू आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या