मराठी बातम्या  /  धर्म  /  Vidur Neeti : जीवनाची लढाई जिंकायची असेल तर महात्मा विदुर यांच्या 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Vidur Neeti : जीवनाची लढाई जिंकायची असेल तर महात्मा विदुर यांच्या 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
May 31, 2023 11:44 AM IST

Vidur Neeti Facts : महात्मा विदुर यांनी विदुरनीतीमध्ये काही गोष्टींचा उल्लेख केला आहे. काही गोष्टींचं आचरण जीवनात केल्यास माणसाला अत्यंत उत्तम जीवन जगता येऊ शकतं असं विदुरनीती सांगते.

काय सांगते विदुरनीती
काय सांगते विदुरनीती

भारताच्या इतिहासात अनेक तत्ववेत्ते होऊन गेले आहेत. अगदी पराशर, विदुर, भीष्म अशी यादी आपल्याला पाहायला मिळू शकेल. या सर्व महात्म्यांनी आदर्श राज्य कसं स्थापन करावं यासंबंधी काही नियम घालून दिले आहेत. त्या तत्वांवर भर दिल्यास आपल्यालाही शांत आणि प्रगतीचं आयुष्य जगता येऊ शकतं. काही नैतिक तत्व आहेत जी पाळल्यास माणसाचं जीवन सुखी होऊ शकतं.

महात्मा विदुर यांनी विदुरनीतीमध्ये काही गोष्टींचा उल्लेख केला आहे. काही गोष्टींचं आचरण जीवनात केल्यास माणसाला अत्यंत उत्तम जीवन जगता येऊ शकतं असं विदुरनीती सांगते.

महात्मा विदुर म्हणतात की, अशा प्रकारच्या संपत्ती प्राप्तीचा विचार सोडून दिला पाहिजे ज्यात धर्माचं उल्लंघन होत असेल, शत्रूपुढे आपली मान खाली जात असेल किंवा आपल्या वागण्याने मनाला आणि शरीराला यातना होत असतील.

महात्मा विदुर यांचे दहा विचार

  • जो विश्वास ठेवण्यास पात्र नाही त्याच्यावर कधीही विश्वास ठेवू नका. जो विश्वास ठेवण्यास पात्र आहे त्यावरही अधिक विश्वास ठेवू नका. विश्वासाने उत्पन्न होणारी भीतीही मूळ उद्देश संपवण्यास पुरेशी असते.
  • एखाद्या बुद्धीमानाला फसवूनही तुम्ही सुखी किंवा शांत राहू शकत नाही. कारण वेळ आल्यावर तीच बुद्धीमान व्यक्ती तुमच्याशी बदला घेण्यास समर्थ असते.
  • मत्सर, इतरांचा द्वेष करणारे, असमाधानी, राग, संशयी आणि परावलंबी हे सहा प्रकारचे लोक त्यांच्या जीवनात नेहमी दुःखी राहतात.
  • आदर दिल्यावर ज्याला आनंद होत नाही, ज्याचा अनादर झाल्यावर त्याला राग येत नाही आणि ज्याचं मन कधीही विचलीत होत नाही अशा व्यक्तीला ज्ञानी व्यक्ती म्हणतात.
  • मूर्ख मनाचा माणूस न बोलवता आत येतो, न विचारता बोलू लागतो आणि विश्वास ठेवण्यायोग्य नसलेल्या व्यक्तींवरही विश्वास ठेवतो.
  • एकटा माणूसच पाप करतो आणि अनेकजण त्याचा आनंद घेतात. जे भोगतात त्यांचा उद्धार होतो, पण जो पाप करतो त्याला एकट्यालाच पातक लागतं.
  • शहाण्या माणसाने वापरलेले शब्द एक राष्ट्र घडवू शकते किंवा एक राष्ट्र बिघडवू शकते. एका धनुर्धाराने मारलेल्या बाणापेक्षाही शब्दांचे बाण जास्त परिणामकारक असतात.
  • वासना, क्रोध आणि लोभ - हे तीन प्रकारचे नरक आहेत, म्हणजे दु:खाचा मार्ग. हे तिन्ही आत्म्याचा नाश करणार आहेत, त्यामुळे त्यांच्यापासून नेहमी दूर राहिले पाहिजे.
  • ज्याला स्वतःचे आणि जगाचे कल्याण किंवा प्रगती हवी आहे अशा व्यक्तीने निद्रा, भय, क्रोध, आळस, तंद्री आण निष्काळजीपणा यांचा त्याग केला पाहिजे.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग