कौरव पांडवांचं युद्ध सत्य आणि असत्याचं युद्ध म्हणून पाहिलं गेलं. अर्थातच सत्याने असत्यावर विजय मिळवला आणि असत्याच्या बाजूने म्हणजेच कौरवांच्या बाजूने लढणाऱ्या सर्व महाबलींचा संहार झाला.
त्यानंतर आपल्या मारल्या गेलेल्या भावंडांचं आणि इतर मारले गेलेले योद्धे आणि ऋषीमुनींचं श्राद्ध पांडवांनी घातलं. पांडवांना या युद्धाचा इतका त्रास झाला की जवळपास एक महिना पांडव नदीकाठावर बसून होते. धर्मराज म्हणून ज्याचं जगात नाव झालं त्या युधिष्ठिराला नदीकाठी विलाप करताना पाहून मोठमोठे ऋषीमुनी त्याच्या सात्वनासाठी तिथे पोहोचले आणि त्याला विलाप थांबवण्यास सांगितले.
या ऋषींमध्ये महर्षी नारद यांचाही समावेश होता. महर्षींनी युधिष्ठिराला विलाप करण्याचं कारण विचारतानाच युद्धात विजयी झाल्याचा आनंद नाही का? असं विचारलं. त्यावर भीम आणि अर्जुनासारख्या भावामुळे आपल्याला या युद्धात विजय मिळवता आल्याचं त्याने महर्षींना सांगितलं.
मात्र जेव्हा रणांगणात अभिमन्यू वीरगतीला प्राप्त झाल्यावर जो शोक द्रौपदीला जो शोक झाला तसाच शोक मलाही जेव्हा कर्ण आमचा मोठा भाऊ होता हे समजल्यावर झालाय असं महर्षींना सांगितलं.
युधिष्ठिर पुढे म्हणाला की, हे महर्षी श्रीकृष्णाने कर्णाला तो सूर्य आणि माता कुंतीचा पुत्र असल्याचं आणि पांडवांचा मोठा भाऊ असल्याचं सांगितल्यावर, कर्णाने मी माझ्या लहान भावांना मारणार नाही असं वचन कृष्णाला दिलं असल्याचं सांगितलं.
कर्ण हा राधेय म्हणजेच राधापुत्र असल्याचं आम्हाला ठावूक होतं. मात्र तो आमचा जेष्ठ बंधू आहे याची आम्हाला सुताराम कल्पना नव्हती असंही युधिष्ठिराने नारदांना सांगितलं. ही गोष्ट आमच्यापासून लपून राहीली आणि नकळत आम्ही आमच्या मोठ्या भावाचा वध करण्याचं पाप आमच्या माथी घेतल्याचही तो म्हणाला.
इतक्यात कुंती तिथे पोहोचली आणि तिनंही युधिष्ठिराला शोक करू नये यासाठी समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र माता कुंतीच्या त्या समजवण्याचा युधिष्ठिरावर उलट परिणाम झाला आणि तो आणखीनच रडू लागला. त्याच रागाच्या भरात त्याने आपल्या आईला श्राप दिला की यापुढे तुझ्या पोटी कोणतंही गुपित राहाणार नाही.
त्यावेळेपासून स्त्रीयांच्या पोटी फारकाळ एखादी गोष्ट लपून राहात नाही असं सांगितलं जातं. मात्र याचा कोणताही दावा हिंदुस्तान टाइम्स मराठी करत नाही.