मराठी बातम्या  /  धर्म  /  Vastu Tips For Chaitra Navratri : चैत्र नवरात्रीला करा वास्तुचे 'हे' उपाय, दुर्गामाता देईल आशिर्वाद

Vastu Tips For Chaitra Navratri : चैत्र नवरात्रीला करा वास्तुचे 'हे' उपाय, दुर्गामाता देईल आशिर्वाद

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Mar 16, 2023 10:33 AM IST

Chaitra Navratri 2023 : नवरात्रीला नऊ दिवस श्रद्धेनं उपवास केले जातील. मात्र नवरात्रीच्या नऊ दिवसात वास्तुशास्त्र नेमकं काय सांगतं, जेणेकरुन नवरात्रीच्या या नऊ दिवसात आपल्या आनंदात आणखी भर पडू शकेल

दुर्गामाता
दुर्गामाता (हिंदुस्तान टाइम्स)

वास्तुशास्त्र आपल्याला जीवनातल्या अनेक महत्वाच्या गोष्टींबाबत माहिती देत असतं किंवा मार्गदर्शन करत असतं. वास्तुशास्त्राचे काही नियम पाळल्यास जगणं काहीसं सुखकर होतं. वास्तुशास्त्र आपल्याला एका मार्गदर्शकासारखं मदत करतं. 

सध्या चैत्र नवरात्र अवघ्या काही दिवसावर आली आहे. अशात चैत्र नवरात्रीला नऊ दिवस देवीचा जागर केला जाईल. आदीशक्तीचा जागर केला जाईल. देवी दुर्गेची वेगवेगळी नऊ रुपं नऊ दिवसात पाहिली आणि पूजली जातील. नवरात्रीला नऊ दिवस श्रद्धेनं उपवास केले जातील. मात्र नवरात्रीच्या नऊ दिवसात वास्तुशास्त्र नेमकं काय सांगतं, जेणेकरुन नवरात्रीच्या या नऊ दिवसात आपल्या आनंदात आणखी भर पडू शकेल, हे आपण आज पाहाणार आहोत.

चैत्र नवरात्रीला वास्तुशास्त्रानुसार कोणत्या गोष्टी कराव्यात.  

दरवाज्यावर लावावे ओमचे चिन्हं

चैत्र नवरात्रीमध्ये ओमचे चिन्ह मुख्य दरवाजावर पूर्व किंवा उत्तर दिशेला लावले जाते. यामुळे सकारात्मकतेचा संचार होईल. नकारात्मक ऊर्जा निघून जाईल. घरात सुख-समृद्धी राहील.

ऑफिसच्या दरवाज्यावर ठेवा पाण्याने भरलेले भांडे

चैत्र नवरात्रीच्या काळात ऑफिसच्या मुख्य दरवाजावर पूर्व किंवा उत्तर दिशेला पाण्याने भरलेले भांडे ठेवावे. त्यात लाल आणि पिवळी फुले घालावी. यामुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश मिळेल. नोकरी-व्यवसायातील समस्या दूर होतील.

दक्षिण-पूर्व दिशेला ठेवावी अखंड ज्योत

चैत्र नवरात्रीमध्ये पूजेच्या ठिकाणी अखंड ज्योत दक्षिण-पूर्व दिशेलाच ठेवावी. वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होते.

देवीचा दिवा लावताना ठेवा दिशेचं भान

दुर्गामातेचा दिवा लावताना त्याची दिशा तेलानुसार करावी. वास्तुशास्त्रानुसार देवीच्या समोर तुपाचा दिवा लावायचा असल्यास तो देवीच्या उजव्या हाताच्या बाजूला आणि तेलाचा दिवा लावायचा असल्यास तो देवीच्या डाव्या हाताजवळ लावावा. असे केल्याने घरात आशीर्वाद प्राप्त होतात.

(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)

 

WhatsApp channel

विभाग